शांतता कमिटीच्या बैठकीला गुन्हेगारांच येत असतील तर गुन्हेगारी संपणार कधी? हरिश्चंद्र लोंढे यांचा निवेदनातून एसपींना सवाल

0

               धुळे- शहरातील सुज्ञ नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांना दि.२६ मे २०२५ रोजी निवेदन दिले. धुळेकर नागरिकांना शांततेचे जीवन जगण्याची अपेक्षा आहे. परंतु धुळे जिल्हा अनेक बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात कुप्रसिद्ध होत आहे. त्यामुळे युपीचा बिहार, महाराष्ट्राचा बीड प्रमाणे धुळे जिल्ह्यात गुन्हेगारीकरण झपाट्याने वाढत असून, त्यामुळे गुंडांचे मनोबल वाढत आहे, शुल्लक कारणांवरून प्राणघातक हल्ले करणे, दहशत बसवण्यासाठी व्हिडिओ चित्रकरण करून ते प्रसारित करणे, व वरून अन्यायग्रस्त पीडितांचे विरुद्ध दरोडे व खंडणीचे गुन्हे दाखल करणे, असे प्रकार चालत आहेत. तसेच यातील बरेच गुंड गुन्हेगार हे पोलिसांमध्ये शांतता कमिटीच्या बैठकींना उपस्थित असतात. गुंड गुन्हेगारांचे शांतता कमिटीच्या निमित्ताने उठबस असल्याचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होत असतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांचे मनोबल दिवसागणिक वाढतच आहे. गुंड व गुन्हेगारांमध्ये अवैध धंदेवाल्यांचे प्रमाण जास्त आहे. 

            सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी गुन्हेगारी गुंडगिरी थांबविणे व पीडीतांवरील खोटे गंभीर गुन्हे तपासात बी समरी करणे, व पीडीत अन्यायग्रस्तांना अटक करू नये, अशाच व्यावसायिक स्पर्धेतून दहशत वाजवण्यासाठी दिनांक २३ मे २०२५ रोजी ज्येष्ठ पत्रकार व व्यावसायिक श्री. मिलींद अवचित बैसाणे हे दलित आहेत, त्यांनी येथे व्यवसाय करू नये म्हणून सामूहिक रित्या कट रचून पाच ते सात गाव गुंडांनी एकट्याला हेरून बेदम मारहाण केली. दहशत वाजवण्यासाठी व्हिडिओ चित्रकरण करून प्रसारित केले. वरून मिलिंद बैसाणे यांच्यावर दरोडे सारखा खोटा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. व खोटा गुन्हा दाखल काढून टाकावा. अशा आशयाचे निवेदन धुळे शहरातील सुज्ञ नागरिकांच्या वतीने संविधान संरक्षण समितीचे प्रमुख श्री. हरिश्चंद्रअण्णा लोंढे, यांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी युवा विधीज्ञ अँड. संतोष जाधव, जितेंद्र पिंपळे, धनंजय गाळणकर, बबन वानखेडे, श्रीकृष्ण बेडसे, दीपकुमार साळवे, रामकृष्ण शिंदे, छोटूलाल मोरे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)