शासकीय विश्रामगृह कोट्यावधींचे घबाड प्रकरणी प्रशासनाचा हलगर्जीपणा ; शिवसेना आक्रमक

0

 

शासकीय विश्रामगृह कोट्यावधींचे घबाड प्रकरणी प्रशासनाचा हलगर्जीपणा, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

तपास नाशिक ए.सी.बी आयुक्तां कडे वर्ग करण्याची मागणी 


          धुळे -  नुतन  जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येऊन, शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथील दि. 21मे रोजी धुळ्यात गुलमोहर रेस्ट हाऊस  येथील रुम नं. 102 मध्ये 1,84,84,000 रु. चे घबाड सापडले. माजी आ.अनिल गोटे यांना गुप्त माहिती मिळाली होती. विधानमंडळाची अंदाज समितीचा दौरा सुरु होता.  समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील हे या रेस्ट हाऊसमध्ये दि. 15 मे पासून राहत  होते. पांझरा या  सुटमध्ये मुक्कामी होते व रुम नं. 102 ही रुम ते जिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून खंडणी वसुली कामासाठी वापरत होते. दि. 21 मे पर्यंत त्यांनी 5 कोटी  रु. च्या वर खंडणी जमा केली. ते वापरत असलेल्या2-3 मोबाईलच्या माध्यमातून भ्रष्ट अधिकार्‍यांच्या नित्कृष्ट, अनागोंदी, बोगस किंवा झालेल्या कामाच्या गैरप्रकारांवर पांघरुण घालण्यासाठी  महानगरपालिका सा.बां. विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय अशा जवळपास सर्व  शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना फोन करुन खंडणी मागत होते व अधिकारी निमुटपणे आणून देत होत.

 यापैकी अनेक फोन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आरडीसी च्या कॅबीनमधून देखील केले आहेत. हे अतिशय गंभीर व धक्कादायक आहे. किशोर पाटील हे 15-20 वर्षांपासून अंदाज  समितीचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. त्यांना एवढ्या वर्षांचा खंडणी गोळा करण्याचा अनुभव आणि अधिकारी देखील पैसे देऊन भ्रष्ट व निकृष्ट कामे करतात. हापायंडा पडला आहे.

 दि. 21 मे रोजी मा.आ.अनिल गोटे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांसह सायं. 6 वा. रुम नं. 102 ला घेराव टाकला. किशोर पाटील त्या रुमला  स्वत:चे कुलूप लावून फरार झाले  होते.

 त्यामुळे या रुममध्ये कोट्यावधी रु. आहेत. याबाबत शंकाच नव्हती. म्हणून श्री.गोंटे यांनी  जिल्हा पोलीस अधिक्षकांना फोन लावला व या रुमची झडती  घेवून कारवाई करण्यासंबधी मागणी केली. बर्‍याच प्रयत्नांनंतर रात्री 11 वाजेनंतर उपअधिक्षक श्री.काळे, तहसिलदार व इतर अधिकारी त्या ठिकाणी आले. रुम नं. 102 चे कुलूप तोडण्यात आले. यावेळी नरेंद्र परदेशी यांना त्याठिकाणी  मध्ये पंच म्हणून आत घेण्यात आले होते.

 पोलीस अधिकारी सोबत नरेंद्र परदेशी आत गेले तेव्हा रुम मध्ये काही 7-8 प्रवासी बॅगा आढळल्या. त्या रिकाम्या होत्या.   1-2 बॅगामध्ये 1-2 कपडे होते. सर्व रुम, बाथरुम चेक केले. तेथे काही नव्हते. मात्र रुमच्या एका कोपर्‍यात एक तपकिरी रंगाचे कपाट होते. श्री.काळे यांनी ते उघडले. त्या कपाटात मात्र 15-16 बॅगा, पिशव्या (काही कापडी, काही प्लास्टीक) आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्या असता त्या नोटांनी भरलेल्या होत्या. विमलची बॅग तर पूर्ण 500 रु. च्या नोटांनी भरलेली होती.

  त्या सर्व नोटांची मशीन द्वारे मोजणी करण्यात आली. बॅगा 15-16 असल्या तरी काही बॅगा एकत्र केल्याने एकूण 12 बॅगांमध्ये रक्कम टाकून ते पोलीसांनी जप्त केले सिल लावले. सर्वपंचांच्या सह्या घेतल्या. या संपूर्ण कार्यवाहीचे कुलूप तोडल्यापासून ते बॅगा पोलीसांनी रुम मधून घेवून जात असल्यापर्यंत सरकारी कॅमेराने व्हीडीओ शुटींग करण्यात आले.

  सदर कार्यवाही रात्रभर व सकाळी5 वाजेपर्यंत चालली. शेकडो शिवसैनिक, नागरिक, पत्रकारांसमोर हे सर्व घडत होते.

  विधीमंडळ समितीच्या अंदाज समितीमार्फत किशोर पाटील हा प्यादा... सर्व सरकारी कार्यालयातील प्रमुख अधिकार्‍यांकडून पैसे अंदाज समितीला पुरविण्यासाठीच खंडणी स्वरुपात गोळा करीत होता हे सिध्द  गोष्ट होय. महत्वाचे म्हणजे आम्ही रुम नं. 102 ला घेराव घालण्यापूर्वी 2-3 तास अगोदर किशोर पाटीलला सुगावा  लागल्याने तो त्यापेक्षा दुप्पट रक्कम घेवून पसार झाला.

 धुळे जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो. कामे न करताच बिले उपटली जातात, किंवा इस्टीमेटच्या  20% देखील काम न करता  नित्कृष्ट बोगस कायदेशीर कामे केली जातात. महापालिकेमध्ये हा भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतो. ज्या विमलच्या पिशवीत 90 लाख रु. आढळले ती पिशवी महापालिकेची होती. तोवर सांकेतिक भाषेत एम-90 असे लिहिले हेाते. ही चर्चा खुलेआम महापालिका आवारात ऐकायला मिळते.

  महापालिकेतील  बोगस कामाविरुध्द श्री.अनिल गोेटे यांनी असंख्य  भ्रष्टाचाराची प्रकरणे घेवून याचिका दाखल केली आहे. कारण अनिल गोटे व नरेंद्र परदेशी यांनी किमान 30 अतिशय गंभीर प्रकरणे पुराव्यासह  तक्रार दाखन करनही दखल घेण्यात आली नाही. त्याची पुरेपुर किंमत 90 लक्ष रु. घेवून अंदाज समितीने या निमित्ताने वसुल केली आहे. भ्रष्टाचार असा दडपला जातो याचे हे उत्तम उदाहरण  होय.

  धुळे रेस्ट हाऊसमध्ये 1.84 कोटी रु. अंदाज समितीच्या स्वीय सहाय्यकाने विविध शासकीय अधिकार्‍यांमार्फत उकळले ही बातमी रात्रभर न्यूज चॅनलवर सुरु होती. राज्यात खळबळ माजली. अनेक प्रश्‍न उपस्थित होवून लागले मा.मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन करु असे म्हटले. मा.अनिल गोटे यांनी प्रशासन, सरकारवर अनेक आरोप कले. परंतु उत्तरे मिळत  नव्हती. किमान अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हादाखल व्हावा अशी मागणी  होत असतांना सरकारने किशोर पाटलांना निलंबित केले. मात्र गुन्हादाखल केला नाही. ही रक्कम कोणा-कोणाकडून जमा केली ? कोणाला देण्यासाठी जमा केली  ? एवढी रक्कम कोणाला देण्याची कारण काय ? किशोर पाटलांना ही रक्कम कोणी गोळा करायला सांगितली ? त्याबरहुकूम किशोर पाटलांनी ती रक्कम गोळा करण्याची धुळे आरडीसी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, गुलमोहर  रेस्ट हाऊस येवून कोणाकोणाला फोन लावले ? त्याने त्यासाठी किती व कोणते मोबाईल फोन व टेलिफोन वापरले त्यांचे नंबर काय ? दि. 15 मे पासून किशोर पाटील धुळ्यात होता. तेथपासून ते दि. 21 मे पर्यंत किशोर पाटील यांच्या व त्याने लावलेले फोन, मोबाईलचे सीडीआर पोलीसांनी मागविले का ? गुलमोहर रेस्ट हाऊस व जिल्हाधिकारी कार्यालय येथील दि. 15 मे ते 21 मे पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले का  ? या काळातील किशोर पाटलांचे मोबाईल लोकेशनचा डाटा तपासला  का  ? ज्याप्रमाणे पोलीस  एखाद्या अज्ञान व्यक्तीचा पार जंगलात खून झाल असेल, ओळख पटत नसेल मृतदेहाचा... तर मृतदेहाच्या  कापडावरुन माग काढला  जातो. त्याप्रमाणे या घटनेत जप्त केलेल्या  पिशव्या व काही 7-8 रिकाम्या  बॅगा, त्यातील कपडे इ. माध्यमातून पोलीसांनी तपास केला काय? जेवढ्या पिशव्या तेवढेच ते देणारे असतील हे स्पष्ट असतांना पिशवी, बॅगा हे चौकशी कामी महत्वाचा पुरावा आहे, त्या दृष्टीने तपास झाला काय ?

  सदर समितीचे सदस्य, शासकीय विश्रामगृहात न थांबता धुळ्याच्या अतिशय महागडड्यज्ञा अशा टॉप लाईन हॉटेल जी स्थानिक आमदाराच्या मालकीची आहे. तेथेच थांबण्याचे कारण काय? तेथे राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च कोणी व का केला ? हॉटेल कोणी बुक केले ? पैसे कोणी दिले? हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले काय ?

  ज्या नोटा जप्त केल्या., त्यामध्ये 100 व 500 रु. चे काही कोरे करकरीत बँकोचे कोणत्या खात्यातून काढल्या किंवा प्रेेस  कट नोटांच्या क्रमांकाची सिरीयल तपासून कोणत्या बँकेतून काढण्यात आल्या, ते खाते कुणाचे ? हे तपासले का ?

  अशा प्रकारे पैसे गोळा करुन लाच देणारे अधिकारी हे त्या त्या खात्यातील नामचीन होते. त्याची उघड चर्चा होत असते, ती चर्चा पोलीसांपर्यंत जात  नाही का ? किंवा हे सर्व प्रश्‍न किशोर पाटलांची लाय डिटेक्टर टेस्ट केली तर उत्तरे सापडतील ? हे का होत नाही ?

   या घटनेमुळे जनतेच्या मनावर विपरीत परिणाम व शासनाबद्दल घृणा, अविश्‍वास  निर्माण होणे लोकशाहीला घातक आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावित्र्य त्यामुळे धोक्यात आले आहे. विधीमंडळाचे सर्वोच्च कर्ता  धमर्ता जर अशा लांछनास्पद घटनेकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांचीही अशा खंडण्या गोळ्या करण्यासाठी मुकसंमती आहे असा संदेश जाईल.

    एकीकडे मा.मुख्यमंत्री एसआयटी स्थापन करण्याची घोषणा करतात, दुध का दुध पानी का पाणी करु अशी शेरेबाजी करतात. विधानसभेचे अध्यक्ष श्री.नार्वेकर गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश देतात. विधानपरिषदेचे सभापती श्री.राम शिंदे देखील गुन्हा दाखल करा म्हणून सुचना करतात. त्या गोश्टीला 4 दिवस उलटूनही गुन्हा  दाखल होत नाही, तर आम्ही समजायचे काय ? की तू मारण्यासारखे कर, आम्ही रडल्यासारखे करतो. असे शासन व प्रशासनाने ठरवले आहे.

      विधीमंडळाची खूप बदनामी होत आहे. वरील प्रश्‍नाची उत्तरे आ वासुन उभी आहेत. राज्याच्या सर्वोच्च सभागृहाची बदनामी म्हणजे देशात महाराष्ट्र हा क्रूर चेष्टांचा विषय होईल ? विधीमंउळाच्या संसदीय परंपरेला व पवित्रतेला लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी वरील प्रश्‍नांची उकल झाली पाहिजे. मुठभर लोकांनी केलेल्या  पापामुळे विधीमंडळाच्या गौरवशाली लौकीक लयास जाता  कामा नये. महाराष्ट्राची मान या घटनेमुळे शरमेने झुकली आहे. पुन्हा ताठ मानेने हा महाराष्ट्र उभा राहायचा असेल तर.. हे प्रकरण नाशिक एसीबी, आयुक्तांकडे सोपवावे , अशा मागण्यांचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल  सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील,  भरत मोरे ,प्रशांत भदाणे, निंबा नाना मराठे,आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, अनिल चौधरी, सिद्धार्थ अहिरे, केतन भामरे, दीपक वाघ, अनिल शिरसाट,तेजस सपकाळ आदींनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)