गुलमोहर मधील 1कोटी 84 लाखच्या घबाड प्रकरणी शिवसेना उबाठाचे धरणे आंदोलन

0

 


गुलमोहर मधील 1कोटी 84 लाखच्या घबाड प्रकरणी शिवसेना उबाठाचे धरणे आंदोलन

दूध का दूध .... पानी का पानी, करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी नेमलेल्या एसआयटीचा प्रमुख कोण ?


1.84 कोटी सापडूनही ईडी, मनी लॉड्रींग, अन्टीकरप्शन, बीएनएस कायद्यान्वये गुन्हे का दाखल होत नाही ?


महाराष्ट्राची इभ्रत व मान खाली घालणाच्या नि किळस आणणारे खंडणी प्रकरण दडपायचे आहे का ? जर दडपायचे आहे तर हम सब चोर है ही घोषणा केव्हा करणार  ?

       जनसंघर्ष न्यूज 

        धुळे :- महाराष्ट्र विधीमंडळाच्या  गौरवशाली परंपरेला काळीमा फासणारे, महाराष्ट्राच्या यच्चयावत नागरिकांची मान शरमेने जाईल ! इतके भयंकर... संत, राष्ट्रपुरुष, नरवीरांची खान असलेल्या महाराष्ट्र ... जो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीचे वेळोवेळी देशाचे नेतृत्व करतो. हाच  महाराष्ट्र भ्रष्टाचाराचे, किंबहुना पैसे कसे खावे ! याचा परिपाठ अर्जुन खोतकर या अलीबाबा नि त्याच्या 40 चोरांनी घालून द्यावा, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?

धुळ्याच्या गुलमोहर रेस्ट हाऊस मधील खोली क्र. 102 येथे 21 मे रोजी तब्बल 1.84 कोटी रु. ची बिनहिशोबी, खंडणीवसुल केलेली रक्कम सापडली. माजी आमदार अनिल गोटे यांच्या   नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी धरणे देत ओरडून ओरडून सांगितले. या खोलीत तब्बल 5 ते साडेपाच कोटी रु. सर्व प्रमुख शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत वसुल केलेली खंडणीची रोकड आहे. खोलीला आ.अर्जुन खोतकरांचा तथाकथित स्वीय सहाय्यक किशोर पाटील याने खाजगी कुलूप लावून 3-5 कोटी घेवून पोबारा केला आहे. अनिल गोटे यांनी तब्बल 25-30 अधिकार्‍यांना याची माहिती दिली. त्यात नासिकचे आय.जी. आयुक्त, एसीबीचे आयुक्त, राज्य शासनाचे संबंधीत सचिव, जिल्हाधिकारी, एसपी. आरडीसी अशा सर्वांनाच माहिती देवून पोलीस पाठवा व रक्कम ताब्यात घेवून कारवाई करा असा तब्बल 6 तास घोषा लावला. यंत्रणा जागची हलत नव्हती. वृत्तवाहिन्यांवर ब्रेकींग न्युज सुरु झाल्या, त्यातच शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी ट्वीट केले नि महाराष्ट्रात खळबळ उडाली. 6 तासांनी पोलीस घटनास्थळी आले. सोबत स्टील कटर, नोटा मोजण्याचे मशीन घेवूनच आले. आणि अनिल गोटे यांचा आरेाप खरा ठरला. त्याखोलीत 1,84,84,200 रु. वेगवेगळ्या पिशव्यांमधून आढळून आले.

महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार असतांना एका पोलीस अधिकार्‍याने गृहमंत्र्यावर आरोप  करीत 100 कोटी रु.वसुलीचा आरोप केला नि त्यांना तुरुंगात डांबले. शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या घरी 10 लाख रु. सापडले.  असा आरोप करुन हिशोब देवूनही त्यांना तुरुंगात धाडले. मात्र येथे 1.84 कोटी रु. सापडूनही अदखलपात्र गुन्हा तो ही तब्बल 10 दिवसांनी दाखल केला. स्वीय सहाय्यक म्हणून ज्याची नेमणूक नाही त्या किशोर पाटलाने तब्बल 10-15 कोटी रु. वसुल केल्याची चर्चा होत आहे.

तरी या घटनेचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांना नाही. त्यांनी एसआयटी घोषणा करुन ङ्कदुध  का दुध  पानी का पानी करुङ्ख अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा केल्या. त्या एसआयटीचा पत्ताच नाही, एवढी प्रचंड रक्कम सापडून देखील बीएनएस, आय.टी, अन्टी करप्शन, मनी लाँड्रींग, ईडी अंतर्गत कायद्यान्वये गुन्हा का दाखल झाले नाही ? अर्जुन खोतकरांना सरकारने ही खंडणी गोळा  करायला सांगितली होती का ? त्या खंडणीचा वाटा शासनाला पण जाणार होता का ? शासनाला महाराष्ट्राची इभ्रत व विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा भ्रष्टाचार दडपायचा आहे का ? जर नाही, तर या गुन्ह्याचा तपास सुयोग्य पध्दतीने का करत नाही ? किशोर पाटलाला खंडणी गोळा करायला कोणी सांगितले. वसुलीचे कारण काय ? पैसे कोणी व का आणुन दिले ? याचा तपास होणार आहे का नाही ! किशोर पाटील, अर्जुन खोतकर, आरडीसी शेलार यांचे मोबाईल फोनचे सीडीआर का लपासत नाही ? या सर्वांची लायडिटेक्टर, नार्को टेस्ट का घेत नाही ? त्याशिवाय का दुध का दुध... पानी का पानी होईल ? नसता पोकळ वल्गना करुन महाराष्ट्राची दिशाभूल करणे थांबवावे.

या भ्रष्टाचाराची व्याप्ती फार मोठी आहे. हा भ्रष्टाचार तळागाळाच्या घटकापर्यंत पोहोचला  आहे. कारण आरडीसी कार्यालयातून जिल्ह्यातील हजारो रेशन दुकानदारांना फोन गेले. ङ्कअंदाजसमिती आली आहे. प्रत्येकी 10 हजार पाठवा. अन्यथा धाड घालण्यात येईल.ङ्ख इतक्या खालच्या थरापर्यंत जावून वसुली झाल्याने महाराष्ट्र या भ्रष्टाचारात आकंठ बुडाला याचे उत्तम उदाहरण होय.

जोपर्यंत या भ्रष्टाचारात सामिल असलेल्या एकूण एक म्हणजे अलीबाबा 40 चोर आणि खंडणी जमा करणारे पैसे देणार्‍यांविरुध्द गुन्हे दाखल  करावे यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आज राणा प्रताप चौकात धरणे आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली, याप्रसंगी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, मा.महपौर  भगवान करणकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे,  शेखर वाघ,आण्णा फुलपगारे, महीला आघाडी संगीता जोशी, ज्योती चौधरी, मयुरी सोनवणे ,कपिल लिंगायत, पंकज भारस्कर, मनिष थोरात, ज् दिनेश पाटील,पिंटू ठाकूर, सलिम लंबु, संदीप चौधरी, आबा हरळ, अजय चौधरी,  भोला गोसावी,दिपक वाघ, हिमांशू परदेशी, योगेश पाटील, वैभव पाटील, केतन भामरे,ईशतियाक अंसारी, शुभम रणधीर, संजय पिंगळे, राहुल दोडे , अनिल चौधरी, चेतन शिंदे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)