एरंडोल चे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा भीषण अपघात प्रकृती चिंताजनक
दशरथ महाजन यांचा घातपात करण्याचा प्रयत्न - कुटुंबीयांचा आरोप
जनसंघर्ष न्यूज
एरंडोल:- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे पदाधिकारी दशरथ बुधा महाजन हे 12 जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर नामदेव महाजन रा.भालगाव यांच्यासोबत पोल्ट्री फार्मच्या बांधकामांच्या ठिकाणी जात असताना भालगाव- बोरगाव रस्त्यावर एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा भीषण अपघात झाला त्यात दशरथ महाजन हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा डाव्या डोळ्याला जबर दुखापत झाली असून डोळ्यांनी कमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे व त्यांच्या दोन्ही बाजूच्या सात बारा गाड्या फ्रॅक्चर असून त्यांच्या डोक्याला व मेंदूला देखील मोठ्या प्रमाणात तिच्या झालेली आहे त्यांचे दोन्ही पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले असून विविध ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याचे डॉक्टरांच्या तपासणी आढळून आले आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव येथील अग्रवाल चौकातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दशरथ महाजन यांचा घातपात करण्याचा प्रयत्न - कुटुंबीयांचा आरोप
दशरथ बुधा महाजन हे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे पदाधिकारी असल्याने ते राजकीय व समाजकारणात नेहमी अग्रेसर असतात त्यामुळेच त्यांचे विरोधक देखील मोठ्या प्रमाणात आहेत.
यामुळे त्यांचा घातपात करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी दशरथ महाजन यांच्या पत्नी कल्पना दशरथ महाजन यांनी पोलीस स्टेशनला कार चालकाविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

