पू. साने गुरुजींच्या 75 व्या स्मृतिदिनी धुळे राष्ट्रसेवा दलातर्फे अभिवादन

0

 

पू. साने गुरुजींच्या 75 व्या स्मृतिदिनी धुळे राष्ट्रसेवा दलातर्फे अभिवादन

             धुळे -  मातृ हृदयी साहित्यिक माय माऊली स्वातंत्र्य सेनानी पूज्य साने गुरुजी यांच्या 75 व्या स्मृतिदिनानिमित्त धुळे महानगर राष्ट्रसेवा दलाच्या वतीने गरुड वाचनालयामागे आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ राष्ट्रसेवा दल साथी बापू ठाकूर व निवृत्त फौजी तुकाराम शेंडे यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. ज्येष्ठ साथी रमेश पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना गुरुजींच्या कार्याला उजाळा दिला. 

              याचवेळी इचलकरंजी येथील राष्ट्रसेवाच्या कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील लिखित राष्ट्रसेवादल स्थापनादिनानिमित्त "अव्याहत सेवेची 84 वर्ष "या प्रदीर्घ लेखाचे सामूहिक वाचन केले गेले. एस आर वाणी सर यांनी आपल्या सुमधुर आवाजात साने गुरुजी व कवी वसंत बापट यांची सेवादल गीते, ध्येय गीते, व समता गीते सादर केली आणि सामूहिकरित्या म्हणण्यात आली. ज्येष्ठ साथी दीपक भाई परदेशी, दत्ताजी बागुल, तुकाराम शेंडे, रामदास जगताप ,रमेश सावंत, नितीन माने ,डॉ. पापालाल पवार आदींनी सेवादल शाखेवरील जुन्या स्मृतींना उजाळा दिला. बालसाथी रुपेश भास्कर पाटील याने बालकांसाठी साने गुरुजींचे योगदान याविषयी माहिती दिली. तासभर चाललेल्या सुटसुटीत कार्यक्रमाचे नियोजनात सर्वच उपस्थित सैनिकांनी लोकशाही समाजवाद ,धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा ,श्रमप्रतिष्ठा या सेवा दलाच्या पंचसूत्रीचा प्रचार प्रसार करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महानगर कार्याध्यक्ष महेश बोरसे पैलवान ,ज्येष्ठ साथी रमेश पाकड ,विजय महाले, भास्कर बापू पाटील, महेंद्र शिरपूरकर, साखरलाल देसले, गोपी लांडगे ,आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास बहुसंख्य साथी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)