मालेगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूल (ROB) व मोहाडी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरण कामासाठी लवकरच अंतिम मंजुरी..!

0




मालेगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूल (ROB) व मोहाडी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरण कामासाठी लवकरच अंतिम मंजुरी..!

रेल्वे बोर्ड पायाभूत सुविधा समितीचे सदस्य श्री. नवीन गुंलाटी यांच्याकडे अंतिम मंजुरीस्तव सादर..!

जनसंघर्ष न्यूज 

           धुळे,  दि. १२ :- दिल्ली येथे संसदीय अधिवेशन सुरु असतांना त्या दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्री नाम. अश्विनी वैष्णव यांची भेट घेत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळे - पुणे रेल्वे सेवा या आधीही सुरू होती मात्र कोरोनाच्या काळात ती बंद करण्यात आली होती ती पूर्ववत सुरु करणे आणि धुळे - मुंबई आणि धुळे - पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करा आणि धुळे लोकसभेतील धुळे शहरात असलेल्या मालेगाव रोडवरील रेल्वे गेट क्रमांक २२ वर रेल्वे उड्डाणपूल (ROB) करा अशी मागणी ९ डिसेंबर २०२४ रोजी केली होती. 

            त्यानंतर १६ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांना भेटून पुन्हा या मालेगाव रोडवरील रेल्वे गेट क्रमांक २२ वर रेल्वे उड्डाणपूल (ROB) बाबत आणि मोहाडी रेल्वे स्थानकावर अनेक सोई सुविधा नसल्याच्या तक्रारी प्राप्त असल्याने या मोहाडी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणासाठी मागणी करत या दोन्ही कामांना गती दयावी अशी मागणी केली. यावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत या दोन्ही कामांबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेशित केले होते. त्यानंतर १० एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथे आणि २३ मे २०२५ रोजी नागपूर येथे याकामी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी प्रभावीपणे आपली बाजू मांडून संबंधित अधिकाऱ्यांना या कामांबाबत सूचना केल्या. त्यावर तात्काळ रेल्वे विभागाने मालेगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूल (ROB) व मोहाडी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरण कामाचा प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्ड पायाभूत सुविधा समितीचे सदस्य श्री. नवीन गुंलाटी यांच्याकडे अंतिम मंजुरीस्तव सादर केला आहे. येणाऱ्या काळात लवकरच याकामांना अंतिम मंजुरी मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांचे खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी आभार मानले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)