धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात आदिवासी भवन व वीर एकलव्य यांचे स्मारक उभारा
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- जिल्ह्यातील आदिवासी समाज वर्षापासून भगवान एकलव्य यांच्या स्मारकासाठी व भवन उभारण्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून मागणी करत आहे.
धुळे जिल्ह्यात आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात असून या आदिवासी समाजाच्या गरजा लक्षात घेऊन शहरातील शासकीय जागेवर वीर एकलव्य आदिवासी भवन व त्यांचे स्मारक खासदार निधीतून बांधण्यात यावी अशी मागणी एकलव्य संघटनेचे महिला आघाडीच्या उपाध्यक्ष मयुरी ताई सोनवणे यांनी खासदार शोभा बच्छाव यांच्याकडे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की शहरात आदिवासी समाजाच्या लग्न समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम समाजाच्या बैठका विविध मागण्यासाठी रस्त्यावर बिऱ्हाड आंदोलन असे अनेक आपत्कालीन व्यवस्थापन म्हणून किंवा बाहेरगावी विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा किंवा भरतीसाठी येतात तेव्हा त्यांना नातेवाईक किंवा बस स्थानकावर पडून राहावे लागते त्यातून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र आदिवासी भवन व शहरात विर एकलव्य जयंती देखील मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते जिल्ह्यातील आदिवासी बांधव जयंती साजरी करण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात वीर एकलव्य यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येत असतात परंतु धुळे शहरात कुठेही स्मारक नसल्याने विर एकलव्य यांचे पुतळे भाडेतत्त्वावर आणून अभिवादन करत जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे खासदार निधीमधून आदिवासी भवन व स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन खासदार शोभा बच्छाव यांना देण्यात आलेली आहे.

