डीवायएसपी सागर देशमुख यांनी माजी आमदार फारुख शहा यांच्या मुलाचा उतरवला माज
नंबर प्लेट नसलेली गाडी अडविल्याच्या कारणावरून वाद
डीवायएसपी सागर देशमुख यांच्या कारवाईने बेशिस्त वाहतूकीला लगाम
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.. कारवाई दरम्यान स्वतः पोलीस अधिकारी सागर देशमुख उपस्थित होते त्यांनी सांगितले की बुलेटवर फटाके फोडण्याचे प्रकार धुळे शहरात मोठया प्रमाणावर सुरु आहे.. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येत आहे. सायलेन्सर काढून दंड आकारण्यात येणार आहे... या कारवाईदरम्यान धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल जवळ पोलीस अधिकारी सागर देशमुख कारवाई करीत असताना माजी आमदार फारुक शहा यांच्या मुलाची देखील गाडी अडवत फॅन्सी नंबर प्लेट असल्यामुळे दंड भरण्यात सांगितला. याचा राग आल्यामुळे माजी आमदार फारुक शहा यांच्या मुलाने देखील पोलिसांसोबत हुज्जत घातली...
यावेळी पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी माजी आमदार यांचे मुलाला ताब्यात घेण्यात सांगितले व फॅन्सी नंबर प्लेट असल्यामुळे दंड भरावाच लागेल, कोणीही असो कायदा सर्वांना सारखा आहे असे ठणकावून सांगत त्याच दंड भरण्यास सांगितले... तर काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.

