दिनदर्पण वृत्तपत्र प्रकाशन सोहळा संपन्न

0

 दिनदर्पण वृत्तपत्र प्रकाशन सोहळा संपन्न 

जनसंघर्ष न्यूज 

          केन्द्रीय मंत्री मा.ना.रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात दिनदर्पण वृत्तपत्राच प्रकाशन करण्यात आले.या प्रकाशन सोहळ्यात मंत्री रामदास आठवले यांच्या तर्फे संपादक नरेश गवळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संपादक नरेश गवळे यांनी दिनदर्पण वृत्तपत्र हे गोरगरीब, दिनदलित, जनतेचा आवाज उठविण्यासाठी, बहुजनांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, नेहमी सत्याची बाजू मांडणारा दर्पण (आरसा) म्हणून काम करेल असे सांगितले.

        या सोहळ्यात रिपाई (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम,सरचिटणीस गोतम सोनवणे,डॉ.विजय मोरे युवा आघाडीचे सचिव, युवाअध्यक्ष पप्पु कादगे ,रोजगार आघाडी चे चंद्रकांत जगताप, अमित तांबे, वाहतुक आघाडी अध्यक्ष चे अजीज शेख ,अँड प्रदिप शिरसाठ, संजय पाटोळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, लोणावळा चे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, चाळीसगाव चे मा.नगरसेवक आनंद खरात,आणि अनेक मान्यवर उपस्थित राहुन दिनदर्पण वृत्तपत्राला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा  दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)