सनातन धर्मविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात युवासेनेचे आंदोलन

0

    


सनातन धर्मविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात युवासेनेचे आंदोलन

जनसंघर्ष न्यूज 

   धुळे :- सनातन धर्मविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख सतिष तात्या महालेंच्या नेतृत्वात युवासेनेचे आंदोलन करण्यात आले आहे.काल समाज माध्यमांसमोर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणने हिंदू दहशतवाद असे विधान करत सकल हिंदू धर्मियांच्या भावना दुखविण्याच काम केलय   काँग्रेसच्या नेत्यांनी आधीपासूनच हिंदू धर्माचा अपमान वेळोवेळी केला आहे.

      तसेच आधीपासूनच फेक narrative पसरविण्याचं काम केलं आहे राजकीय फायद्यासाठी वोट बँकेचे राजकारण करण्यासाठी काँग्रेस त्यांच्या स्थापनेपासूनच सनातन धर्मावर वेळोवेळी अभद्र टिपण्णी करत असतात   सनातन धर्म हा आमचा स्वाभिमान आहे हा भगवा शिवरायांचा,वारकऱ्यांचा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्वाभिमान आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ सकल सनातन धर्माची मागावी अन्यथा युवासेना पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही तसेच पृथ्वीराज चव्हाणला इस्लाम धर्माचा एवढा पुळका असेल तर त्यांनी स्वतःचे नाव पृथ्वीराज चव्हाण बदलून मोहम्मद घोरी करून स्वतःची सुन्नत करून घ्यावी असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सतिष तात्या महालेंच्या नेतृत्वात युवासेनेच्या वतीने देण्यात आला.    

     यावेळी युवासेना महानगरप्रमुख योगेश भैय्या मराठे,अमित खंडेलवाल, शिवसेना सोशल मीडिया धुळे लोकसभा प्रमुख प्रसाद महाले,युवासेनेचे शुभम अनिल ठाकूर पाटील,कल्पेश चौधरी,चेतन धामेचा, देवा गायकवाड,नितीन धनगर,वेदांत करणे,प्रवीण मराठे,सागर धिवरे,आकाश पाटील,नितीन मराठे,प्रतीक शिंदे,सागर पाटील आदित्य वानखेडे व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)