भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्याला शिवसेनेचा विरोध ; आम्हाला आमच्या विधवा भगिनींचं कुंकू महत्त्वाचं
केंद्रशासनाच्या धोरणा विरोधात शिवसेना उबाठाचे आंदोलन
धुळे :- पहेलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान देशासोबत येत्या १४ सप्टेंबर २०२५ रोजी भारत देश पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळून आमच्या भगिनींचे सिंदूराचा अपमान करण्याचे काम करत आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज रविवारी १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता धुळे जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने झाशी राणी पुतळा चौक, धुळे येथे मेरा देश मेरा सिंधूर हे आंदोलन करण्यात आलं, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मी प्रभागातून कुंकू गोळा करून सदर कुंकवाचा करंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयावर पाठविण्यात येणार असून
एकीकडे हिंदुत्वाच्या नावाने देशातील जनतेचे माते भडकवायचे आणि दुसरीकडे पाकिस्तान देशांसोबत क्रिकेट खेळायचे अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत असून त्यांच्या विरोधात आज शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी केली, याआंदोलनानंतर सिंधूची डबी देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांना भारतीय डाक सेवेद्वारे पाठविण्यात आली . "हमारा सिंदूर हमारा देश" याची जाणीव भारत सरकारला करून करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांच्या आदेशाने उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे , महिला आघाडीच्या संगीता जोशी, अरुणा मोरे, सुनिता शिरसाट, जयश्री वानखेडे, ज्योती चौधरी, सुषमा महाले, मीनाक्षी सोनवणे, शोभा पाटील,नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, बाबाजी पाटील, निंबा मराठे, अण्णा फुलपगारे, विवेक सूर्यवंशी, शिवाजी शिरसाळे, महादू गवळी, पिनु सूर्यवंशी, दिनेश अण्णा पाटील, डॉ. अनिल पाटील,अजय चौधरी, प्रशांत ठाकूर, बबलू गुरव, नितीन देशमुख, नितीन जडे, निलेश कांजरेकर, अमोल ठाकूर, अनिल शिरसाट, राजू पाटील, वैभव पाटील, तेजस सपकाळ आदिसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

