राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) तर्फे धुळ्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

0

 

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) तर्फे धुळ्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

जनसंघर्ष न्यूज 

धुळे शहर प्रतिनिधी - सिद्धार्थ मोरे

धुळे :- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) कडून उमेदवारांची चाचणी व मुलाखतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.धुळे शहरातील जेलरोड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या .

या वेळी माजी मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुलाखती पार पडल्या .या प्रसंगी धुळे शहराचे माजी आमदार फारुक शाह,कैलास चौधरी, जोसेफ मलबारी,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.मनपा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने संघटनात्मक  मजबुती, प्रभागातील कामगिरी , जनसंपर्क व पक्षनिष्ठा या निकषांवर उमेदवारांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली.यावेळी बोलताना माजी मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की , राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट) हा महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असून भाजपकडे युतीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे.मात्र अद्याप भाजपकडून कोणताही ठोस प्रतिसाद  मिळालेला नसल्याने आणि पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने उमेदवारांची चाचणी प्रकिया सुरू करण्यात आली आहे.ते पुढे म्हणाले की, महायुतीचा धर्म पाळणे ही आमची पहिली भूमिका राहील.मात्र , युती न झाल्यास किंवा मैत्रीपूर्ण लढत लढण्याची वेळ आली तर त्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पूर्णपणे सज्ज आहे.आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्यास महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न राहील.अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.या मुलाखतीच्या माध्यमातून पक्ष शहरातील प्रत्येक प्रभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत असून आगामी निवडणुकीसाठी मजबूत आणि लोकाभिमुख उमेदवार देण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्वाची ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)