रविवार, २८ जून, २०२६

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील १३१ गावांची सामाजिक अंकेक्षण जन सुनावणी संपन्न


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील १३१ गावांची सामाजिक अंकेक्षण जन सुनावणी संपन्न 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - महाराष्ट्र शासन यांच्या , महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी ( मंत्रालय,मुंबई ३२ ) यांच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत २५ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता पंचायत समिती सभागृह पं.स. धुळे जि. धुळे येथे वार्षिक जन सुनावणी सभा आयोजित करण्यात आली होती. 

          या जन सुनावणी सभेत धुळे तालुक्यातील १३१ गावातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या समजून घेत सूचना ऐकून घेत त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करून रोजगार हमी योजनेचे अंतर्गत झालेल्या कामांची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी सामाजिक अंकेक्षण अहवालाचे वाचन व चर्चा करण्यात आली.

        यावेळी या कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व १) कपिलदेव चनेसर व्याले – जिल्हा साधन व्यक्ती (District Resource Person) ,२) उमाकांत गुलाबराव पाटील – अध्यक्ष (NGO प्रतिनिधी) ,३) ॲड. राहुल राजेंद्र निकुंभ – सदस्य (विधी / कायदेतज्ज्ञ) , ४) राकेश दिलीप पाटील – सदस्य (मजूर प्रतिनिधी) यांनी केले.

        या प्रसंगी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शासकीय प्रतिनिधी, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक हे देखील उपस्थित होते.

लेबल: , , ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ