🔴 जनसंघर्ष न्यूज इम्पॅक्ट! सुंदरच कॉलनीतील महिनाभराची पाणी समस्या अखेर मार्गी लागण्यास सुरुवात
🔴 जनसंघर्ष न्यूज इम्पॅक्ट! सुंदरच कॉलनीतील महिनाभराची पाणी समस्या अखेर मार्गी लागण्यास सुरुवात
नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाची धावपळ; पाइपलाइन दुरुस्ती आणि रस्त्याच्या खोदकामाला सुरुवात, नागरिकांना दिलासा
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- शहरातील साक्री रोड परिसरातील सुंदरच कॉलनीमध्ये गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पाणीपट्टी भरूनही नळाला पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.
यावेळी महानगरपालिका पालिका पाणी प्रशासन अभियंता नवनीत सोनवणे यांच्याशी संपर्क केल्यानंतर यांनी सुंदरच कॉलनी येथे सकाळी साडेदहा वाजता भेट देऊन नागरिकांची संवाद साधताना समस्या ऐकून घेत नंतर आमच्याकडे आता काम करायला माणसं नाहीत व आम्ही आता दोन दिवसानंतर काम करून देऊ त्यानंतर देखील पाणी आले नाही तर आम्ही जबाबदार नाही असे उडवा उडवी चे उत्तर देऊ लागल्याने येथील स्थानिक नागरिक पत्रकार दिनेश निकुंभ यांनी त्यांना प्रश्न विचारतात त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी पत्रकारांशी हुज्जत घालत व्हिडिओ काढले तर दोन दिवस काम होणार असे बोलत इथून पलायन केले होते. त्यानंतर पत्रकार दिनेश निकुंभ यांनी बातमी प्रसारित करताच महिनाभरापासून गाड झोपेत असलेले पाणी प्रशासन काही तासातच जागे होऊन महापालिका प्रशासनाकडून सुंदरच कॉलनीतील पाणीपुरवठा समस्या सोडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे दिसून आले.
या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर जनसंघर्ष न्यूजने नागरिकांचा पाणीप्रश्न ठळकपणे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
यानंतर प्रशासनाकडून सुंदरच कॉलनी परिसरात पाणीपुरवठा पाइपलाइनची पाहणी आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पाइपलाइनपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून, जेसीबीच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली असून नळाला पाणी सोडण्यात आले आहे पण पाणी मोठ्या प्रमाणात दूषित येत असल्याने पाइपलाइन मधील बिघाड दुरुस्त करून परिसरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिनाभरापासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे, नागरिकांचा प्रश्न मांडल्यानंतर प्रशासनाने दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने हा ‘जनसंघर्ष न्यूज इम्पॅक्ट’ असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मात्र, दुरुस्तीचे काम पूर्ण करून प्रत्यक्ष नळाला नियमित पाणी कधी येणार? हा महत्त्वाचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने काम तातडीने पूर्ण करून दूषित पाण्याचे समस्या सोडवून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कॅमेरामनसह, जनसंघर्ष न्यूजसाठी — पत्रकार दिनेश निकुंभ.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, समस्या, सामाजिक














