राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम निधीचा गैरवापर बापू कोळी यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन.
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम निधीचा गैरवापर
बापू कोळी यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन.
जनसंघर्ष न्युज
धुळे- राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासनाकडून मिळालेल्या निधीचा पशुवैद्यकीय दवाखाना विखरणच्या अधिकाऱ्यांनी गैरवापर केला आहे.याप्रकरणी संबंधितांवर चौकशीनंतर कारवाई करण्यात यावी,अशा आशयाचे एक निवेदन बापू दयाराम कोळी यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर तालुक्यातील विखरण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनावरांच्या लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.मात्र या लसीकरणाच्या मोहिमेत संबंधितांनी अनियमितता तसेच निधीचा गैरवापर केला असल्याचा आरोप बापू कोळी यांनी केला आहे.
याप्रकरणी संबंधितांविरुद्ध चौकशीअंती कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.अशा आशयाचे एक निवेदन बापू कोळी यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. या प्रकरणी चौकशी न झाल्यास पुढील आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही बापू कोळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ