रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

धुळ्यात रक्तदानाने स्वातंत्र्य दिन साजरा, 500 रक्त बाटल्यांचा संकल्प...आकाश साखला यांचा पुढाकार तर रक्तदात्यांना इंडक्शन कुकची भेट..

धुळ्यात रक्तदानाने स्वातंत्र्य दिन साजरा, 500 रक्त बाटल्यांचा संकल्प...

आकाश साखला यांचा पुढाकार तर रक्तदात्यांना इंडक्शन कुकची भेट..






जनसंघर्ष न्युज 

धुळे - धुळ्यात रक्तदान शिबिराने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे. खंडेराव बाजार समितीच्या आकाश साखला यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचा आदर रोड येथे आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना इलेक्ट्रिक इंडक्शन कुकची भेट देण्यात आली. सकाळपर्यंत 80 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं तर सायंकाळपर्यंत 500 रक्त बाटल्यांचा संकल्प असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आकाश साखला यांनी दिली आहे. 

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीतून व गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता आकाश साखला यांच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून रक्तदान शिबिराचा आयोजन केलं जात आहे. या वर्षी देखील भारत मातेसह महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याच दिसून आलं. 

रक्तदान शिबिरातून स्वातंत्र्य दिन साजरा होत असल्याने या युवा सामाजिक कार्यकर्त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ