खोली क्रमांक 102 मधील एक कोटी 84 लाख च्या घबाड प्रकरणी देवेंद्र फडणवीस गप्प का ?
शिवसेना नेते खासदार संजय राऊत
जन संघर्ष न्यूज
धुळे - माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथील खोली क्रमांक 102 मधील 1 कोटी 84 लाख 84 हजार चे घबाड उघडकीस आणून दिले याचे पडसाद राज्यासह देशात सध्या धुळ्यातील खोली क्रमांक 102 प्रकरण प्रचंड गाजत आहे. एखादा रहस्यमय सिनेमा निघावा इतकं हे प्रकरण गंभीर आहे असं शिवसेना उबाठा नेते खासदार संजय राऊत धुळ्यात पत्रकार परिषदेत म्हणाले. आगामी निवडणुकांबाबत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत हे शनिवार दिनांक 31 मे रोजी धुळ्यात आले होते. मेळाव्यापूर्वी त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. यात प्रामुख्याने धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मधील कॅश कांड प्रकरणावरच त्यांनी जास्त भाष्य केलं. नुकताच गुन्हा दाखल झाल्यानंतर जेलीत गेलेले कामराज निकम यांच्या प्रकरणावर देखील खासदार राऊत यांनी पोलिसांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. पालकमंत्र्यांसाठी आव्हान ठरलेले कामराज निकम यांना सत्तेचा गैरवापर करून गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली. हीच तत्परता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खोली क्रमांक 102 प्रकरणाबाबत का दाखविली नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी याबाबत तब्बल नऊ दिवस का लागले. विधिमंडळाची अत्यंत महत्त्वाची असलेल्या अंदाज समितीला नजराना सादर करावा लागतो. या समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार खोतकर अगोदर आमच्या पक्षात होते. ते तिकडे का गेले. कारण त्यांना ईडीची मोठी भीती होती. मुळातच भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी असल्याने ते भ्रष्टांच्या गटात गेले. खोली क्रमांक 102 बाबत मुख्यमंत्र्यांनी नेमलेली एसआयटी आहे कुठे. आता गुन्हा दाखल झाला आहे तर एसआयटी हवी कशाला असा प्रश्नही खासदार राऊत यांनी उपस्थित केला. या प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे हे मुख्य साक्षीदार आहेत. त्यामुळे खोली क्रमांक 102 प्रकरण दडपण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ते आम्ही होऊ देणार नाहीत. आम्ही लढतोय आणि लढत राहू यास बरोबर कामराज निकम प्रकरण देखील आम्ही सोडवू. खोटे गुन्हे दाखल करून आमचं मनोबल खच्चीकरण कुणीही करू शकत नाही. अशा अनेक प्रयत्नांमुळे आम्ही अगदी कणखर झालो आहोत. त्यामुळे लढणे आमची सवय आहे असंही खासदार राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार अनिल गोटे, अद्वय हिरे, शुभांगी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

