त्या वादग्रस्त अनधिकृत शाळेवर अखेर शिक्षणाधिकारी यांचा हातोडा
जन संघर्ष न्यूज
नाशिक - शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नाशिक जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथे सुरू असलेली लासलगाव नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित बी आय शेख उर्दू प्राथमिक शाळा ही अनेक दिवसापासून अनधिकृत पणे चालवली जात होती या संदर्भात लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद रमजी तांबोळी यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केल्या होत्या त्यानुसार शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमून संबंधित शाळेची व तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची चौकशी केली समितीने सादर केलेल्या अहवालानुसार व नोंदवलेल्या नित्कर्षानुसार सध्या स्थितीत या शाळेत क्रमांक प्राप्त नाही त्यामुळे सदरची शाळा ही अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले असता सदर संस्था चालकाने बालकांच्या मोफत व शक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 चे कलम 18 (5) अंतर्गत उल्लंघन केले आहे.
सदर शाळा अनधिकृत पणे सुरू ठेवल्यामुळे संस्थाचालकास 1 लाख रुपये की शासकीय शास्ती भरण्याचे आदेश, तसेच प्रतिदिन 10 हजार रुपये प्रमाणे आजपावेतो शासकीय शास्ती ( दंड ) आकारण्यात यावा, दोन्ही दंड आकारणीची रक्कम शासन सदरी जमा करून अनधिकृतपणे सुरू असलेली शाळा तात्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावी.
अनधिकृत शाळा सुरू केल्याबाबत संबंधित शाळा / शाळा व्यवस्थापन यांच्याविरुद्ध नजिकच्या पोलीस स्टेशन फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी निफाड येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे

