धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेची मागणी
धुळे - राज्यातील ग्रामीण भागातील अकरावीचे प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याची मागणी नुकतीच धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेने केली आहे त्याबाबत सदर मागण्यांचे निवेदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना धुळे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे सदर निवेदनात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राज्यातील महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या वर्षापासून आपल्या सरकारने ही प्रक्रिया ग्रामीण भागातही ऑनलाईन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे होणाऱ्या त्रासामुळे, येणाऱ्या अनेक अडचणीमुळे, वाढीव खर्चामुळे ग्रामीण भागातील पालक, विद्यार्थी आणि शिक्षकात प्रचंड असंतोष आहे. याबाबत पुढील खुलासा करीत आहोत.
ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांकडे किंवा त्यांच्या पालकांकडे स्वतःचे अँड्रॉइड मोबाईलसुद्धा नाहीत.राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नेटवर्क सुविधा उपलब्ध नाही. विद्याथी किंवा पालकांकडून तसेच शैक्षणिक संस्थांकडूनही अशा पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याची कुठलीही मागणी केली नाही.
ग्रामीण भागात अकरावीतील विद्याथ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे . ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सहाय्य करण्याच्या हेतूच्या नावाने तेथील सायबर कॅफे व इतरांकडून अवास्तव रक्कम मागत विद्यार्थी व पालकांची लूट मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे.
ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेच्या पद्धतीने जाण विद्यार्थी, पालक व त्या भागात काम करणाऱ्या शिक्षकांना अद्याप पर्यंत पुरेशा प्रमाणात झालेले नाही. उन्हाळ्याच्या सुट्टी तही शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सुट्टी न घेता महाविद्यालयात केवळ ह्या एकाच कामासाठी पूर्ण वेळ देऊनही त्यातून काही निष्पन्न होत नाही. ऑनलाईन प्रक्रियेसाठी अकारण खर्च करावा लागत आहे.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अकरावीचे वर्ग सुरु होण्यास उशीर होतो व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या वेबसाईटच्या तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया खोळंबलेली असल्याने पालक व शिक्षकांच्या मनात प्रचंड संताप व चीड निर्माण झालेली आहे.
सदर वरील बाबी लक्षात घेऊन मोबाईल व नेटवर्क अभावामुळे तसेच पालक विद्यार्थी शिक्षण संस्था यांची कुठलीही मागणी नसल्याने विद्यार्थी व पालक यांची ससेहोलपट टाळण्यासाठी ही ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्याचा प्रक्रिया तत्काळ थाबवून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देण्याची मुभा संबंधित संस्थांना देण्यात यावी अशी मागणी
राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे ,ज्युनियर कॉलेज अध्यक्ष प्रा पंकज पाटील, जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील,कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे,
जिल्हा उपाध्यक्ष शैलेश धात्रक, धुळे तालुका अध्यक्ष किरण मासुळे ,दामोदर पाटील, राजेश शिरुडे, मुश्ताक शेेेख व समस्त पदाधिकारी सदस्यांनी
केली आहे.

