स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बसपाला चांगले यश मिळेल,प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
नंदुरबार - यावेळी आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्ष संपूर्ण ताकदनिशी निवडणूक लढवावी व निवडणुकीत बहुजन समाज पक्ष चांगल्या प्रकारे यश कसे मिळेवेल असे बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिलजी डोंगरे साहेब यांनी मार्गदर्शन केले . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व संघटन मजबूतीच्या पार्श्वभूमीवर आज नंदुरबार येथे बहुजन समाज पक्षाची संघटनात्मक बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीला बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब, विदर्भ झोन इन्चार्ज मा.ईजि उयके साहेब , मालेगाव नंदुरबार झोन इन्चार्ज मा . रमेशजी निकम , जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे, जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे, जिल्हा प्रभारी मनोजभाऊ वसईकर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिलजी डोंगरे साहेब यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद ,महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीत बहुजन समाज पार्टी मोठ्या ताकदीनिशी उभी राहणार आहे. बहुजनांचे नेतृत्व अनेक वेळा पक्षाने केले आहे. बहुजनांना न्याय मिळावा बहुजनांचे कल्याण व्हाव यासाठी बहन कु. मायावतीजी यांच्या नेतृत्वात पदाधिकारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. काही मनुवादी व्यवस्थेमुळे समाज विखुरला गेला आहे परंतु आम्ही महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी जाऊन तळागाळातील लोकांशी चर्चा करून त्यांचे संघटन करून एकत्र करण्याचे काम करीत आहोत. येणाऱ्या दिवसात मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरे जाणार आहोत व या निवडणुकीत चांगल्या प्रकारे यश संपादन करू असे प्रदेशाधक्ष सुनील डोंगरे यांनी सांगितले.
यावेळी बैठकीत मालेगाव जिल्हाध्यक्ष सुनील पवार. जि.उपाध्यक्ष सुनिल जावरे. महीला जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई जाधव.महीला महासचिव मा .विश्वास पवार .महीला उपाध्यक्ष चंद्रकांला मोरे. महासचिव सना जावेद शहा जि सचिव राजेंद्र महाले. जि सचिव मा. ललित पानपाटिल. सालीया पठाण. जि कार्यकारी सदस्य मा देविदास अल्हाटकर. विधानसभा मा .उपाध्यक्ष सुभाष महीरे. रुपाताई घंमडे. महासचिव मा.अविनाश वाघ गौतम शिरसाठ. प्रा. श्रीकांत जी पवार विधानसभा कोषाध्यक्ष मा योगेश बच्छाव नंदुरबार शहर सचिव मा.शहर कोषाध्यक्ष प्रमोद अहीरे अजय वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

