
छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त गरताड गावात रक्तदान शिबिर संपन्न
जन संघर्ष न्यूज
धुळे :- तालुक्यातील गरताड गावात दिनांक 26 जून रोजी आरक्षणाचे जनक बहुजनांचे कैवारी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीचे निमित्त सामाजिक कार्यकर्ते शरद अहिरे , आनंद देवरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिकांनी उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने रक्तदान करून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरताड गावात अभिवादन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समाज रक्षक वाडी भोकर चे नगरसेवक रंगनाथ दादा ठाकरे व नर्व्हाळ गावाचे सरपंच हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज व क्रांतिवीर तंट्याबिल त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गावकऱ्यांनी देखील अभिवादन केले व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान करून महामानवास अभिवादन कसे करावे याचा आदर्श गरताड येथील गावकऱ्यांनी दाखवून दिला.
या कार्यक्रमात गरताड गावातील उपसरपंच दावल अहिरे, संस्थापक अध्यक्ष क्रांतिवीर तंट्या बिल बहुद्देशीय संस्था चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लक्ष्मण पवार यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचे आयोजक आनंद देवरे यांनी देखील सगळ्या उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
