गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करा ; धुळे न्यायालयाचे पोलिसांना आदेश
मा. आमदार अनिल गोटे यांच्या प्रयत्नांना यश
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- दिनांक 21 मे रोजी महाराष्ट्र हदरवणारी घटना धुळे शहरात मध्यरात्री घडली होती. शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे खोली क्रमांक 102 मध्ये 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची बेहिशोबी रोकड सापडली होती. ही घटना माजी आमदार अनिल गोटे यांनी उघडकीस आणून सदर रक्कम आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळाच्या अंदाज समितीला लाच म्हणून देण्याकरिता शासकीय अधिकाऱ्यांकडून एकूण 15 कोटी रुपये गोळा करण्यासाठी त्यांचे कथित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना पाठवण्यात आलेले होते.
यासाठी अर्जुन खोतकर यांच्या सांगण्यावरून कथित स्वीय सहाय्यक, किशोर काशिनाथ पाटील हे विनांक १५ मे पासूनच धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात मुक्कामी येऊन बसले होते, ते पैसे गोळा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी शेलार यांच्या कार्यालयात बसून, जिल्हाभरातील सर्व अधिकाऱ्यांना फोन लावून, धमकावून, तुमच्यावर कारवाई करू, अन्यथा तुम्ही एवढे, एवढे पैसे धुळ्यात किशोर पाटील यांच्याकडे जमा करा, अशा उघड उघड धमक्या देऊन त्यांच्या कडून खंडणी गोळा केली जात होती.
सदर माहिती अनिल अण्णा गोटे यांना दिनांक २० मे रोजी, महसूल विभागाच्या एका शिपायाने फोन करून सांगितले की, आर.डी.सी. साहेबांच्या कार्यालयात प्रचंड पैसे गोळा केले जात आहे. अर्जुन खोतकर यांचे पी.ए. १५ तारखेपासून येथे ठाण मांडून बसले आहेत. सदर पैशाचे वाटप उद्या दिनांक २१ मे रोजी केले जाणार आहे. श्री. अनिल अण्णा गोटे यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला, दिनांक २१ रोजी सकाळी आठ वाजेपासून रेस्टहाऊसवर बसायला सांगितले. सदर कार्यकर्त्याने दुपारी चार बाजता फोन करून, येथे पाच साडेपाच कोटी रुपये गोळा झाले असे सांगितले. त्यानंतर अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकारांना फोन करून बोलावून घेतले व सगळ्या पत्रकारांना घेऊन रेस्ट हाऊस च्या १०२ नंबरच्या कक्षाजवळ, जेथे खंडणी गोळा केली होती, त्या ठिकाणी गेले असता, सदर रेस्ट हाऊसला खाजगी कुलूप लावून, किशोर पाटील फरार झाले होते. श्री. अनिल अण्णा गोटे यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना; या ठिकाणी पाच ते साडेपाच कोटी रुपये गोळा करण्यात आले असे सांगितल्यावर, पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी दहा मिनिटात येतो सांगितले. परंतु सकाळी पाच वाजेपर्यंत आलेच नाही. अखेर रात्री ११ वाजून २० मिनिटांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. काळे आल्यावर, त्यांनी १ कोटी, ८४ लाख, ८४ हजार, २०० रुपये ताब्यात घेतले, मात्र तत्पूर्वी बंद कुलुपाचा पंचनामा करणे, हाताचे ठसे घेणे, वगैरे काही पूर्तता केली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की, पोलीस आधीच आरोपींना फितूर झाले होते, अखेर पोलिसांनी तब्बल १२ दिवसानंतर, बॉम्बे पोलीस ॲक्ट च्या कलम १८४ खाली अदखलपात्र गुन्हा दाखल करून आपल्या मदतीची प्रदक्षिणा पूर्ण केली. माध्यमांमध्ये याबद्दल बरीच आरडा ओरड झाली. माध्यमांनी सदर प्रकरण लावूनपण धरले, परंतु निगरगट्ट सरकारने अजिबात वाव दिली नाही. अखेर अनिल अण्णा गोटे व त्यांचे शिवसेनेचे सहकारी नरेंद्र परदेशी, तत्कालीन विरोधी पक्षनेते, महानगरपालिका व उपजिल्हाप्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी साी. श्री चौगुले साहेब यांच्या न्यायालयात दाद मागितली असता, माननीय न्यायालयाने आज दि. २७ रोजी सदर प्रकरणी, भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १७४, १७३, २१० ब ब १७५ (३) कलमाखाली तातडीने गुन्हा दाखल करून, एफ. आय. आर. नोंदवण्याचे सुस्पष्ट आदेश दिलेले आहेत.

