अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेने देश हादरला
200 च्यावर प्रवाशांचा दुर्दैवी अंत 50 नागरिक जखमी
जनसंघर्ष न्यूज
अहमदाबाद :- गुजरात येथील अहमदाबाद शहरात एअर इंडियाचे विमान AI -171 दुर्घटनेत 204 लोकांचे मृतदेह सापडले आहेत, अहमदाबाद पोलीस कमिशनर यांनी एअर इंडिया दुर्घटनेची माध्यमांशी बोलताना सांगितले की, आत्तापर्यंत 204 मृतदेह मिळाले असून 41 जखमी प्रवासींवर उपचार सुरू आहेत. या विमानात एकूण 242 प्रवासी होते.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले प्रवाशांची ओळख करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रवाशांच्या नातेवाईकांचे डी एन ए सॅम्पल घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने विमान अपघातातील मृत्युमुखी प्रवाशांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचे डी एन ए सॅम्पल घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोग्य विभाग चे प्रमुख सचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितले की पीडितांची ओळख करून घेण्यासाठी बीजे मेडिकल कॉलेज चे कसोटी भवन येथे विशेष व्यवस्था केली गेली आहे.
धनंजय द्विवेदी यांनी सांगितले की अपघातात मृत्यू झालेल्या जवळच्या नातेवाईकांनी जसे की आई वडील मुलं यांनी बी एन ए सँपल लवकरात लवकर द्यावे. हा तपासणी हॉल बी.जे मेडिकल कॉलेजच्या ग्राउंड फ्लोअर ला असेल. हॉस्पिटल प्रशासनाने देखील सर्व पीडित कुटुंबीयांना आणि त्यांच्या जवळील मित्रांना डि एन ए सॅम्पल साठी सहकार्य करावे जेणेकरून मृतांची ओळख लवकरात लवकर व्हावी.
सदर घटनेतील 50 जखमींवर अहमदाबाद सिविल हॉस्पिटल रामा सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत, आणि अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार सर्व जखमींची तब्येत सध्या स्थिर आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात बी.जे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर होस्टेलवर पण पडल्याने होस्टेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या विमानाचा अपघात झाला आहे ते कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होती त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर होते. कॅप्टन सुमित साभरवाल अनुभवी पायलट होते त्यांना 8200 तास विमान उडवण्याचा अनुभव होता. या अपघातानंतर दिल्ली वरून अहमदाबाद जाणाऱ्या विमानाच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.
या घटने नंतर एअर इंडियाने अपघात झालेल्या विमानातील प्रवाश्यांबद्दल माहिती देण्यात आली की, विमानात 169 भारतीय नागरिक , 53 ब्रिटिश नागरिक , 1 कनाडाई नागरिक आणि 7 पोर्तुगालचे नागरिक प्रवास करत होते.
यापैकी एक प्रवासी जिवंत वाचला असून या प्रवासीला गंभीर दुखापत झालेली असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे हा प्रवासी याच विमानात सीट नंबर 11A ने प्रवास करत होता त्याचे नाव रमेश विश्वास कुमार असे आहे सध्या तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

