शहरात भर दिवसा अवजड वाहन सुसाट
एस पी साहेब वाहतूक पोलीस मोठ्या अपघाताची वाट बघत आहे का ?
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- धुळे शहरात दिवसेंदिवस अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र वाहतूक पोलीस शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्या ऐवजी यावर कानाडोळा करून महामार्गावर ट्रक अडवत वसुली करण्यात व्यस्त असतात नागरिकांच्या मनात संकोच निर्माण झाला आहे की धुळे शहरात प्रकाश टाकी चौक , लोकमान्य हॉस्पिटल चौक , महात्मा गांधी पुतळा , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आग्रा रोड , तालुका पोलीस स्टेशन समोर , 12 पत्थर चौक , देवपूर परिसर अशा अनेक ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असते तेथे नेहमी वाहतूक पोलीस गरजेचे असतात परंतु वाहतूक पोलिसांची तेथे बंदोबस्त न करता रेसिडेन्सी पार्क चौफुली, हिरे मडिकल कॉलेज समोर, पारोळा चौफुली, नगावबारी ब्रिज जवळ, सुरत बायपास अश्या अनेक ठिकाणी महामार्गावर ट्रक अडवून कलेक्शन करतांना दिसून येतात जणू यांना कोणाचाही धाक उरलेला नसावा.
मागील वर्षी मे महिन्यात देवपूर परिसरात भडगाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका अठरा वर्ष दुचाकी स्वराला चिरडल्याची घटना घडली होती. तेव्हा देखील अवजड वाहनाचा मुद्दा वर आला होता तेव्हा पोलीस अधीक्षक यांनी अवजड वाहन संदर्भात एक पत्र जाहीर केले होते त्या पत्रकात अवजड वाहन संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली होती पण ती नियमावली फक्त काही महिने अवजड वाहनधारकांनी व वाहतूक पोलिसांनी पाळली. त्यानंतर जैसे थे दिसून आले.
काही दिवसापासून तर रेतीचे डंपर भर दिवसा शहरात वावरताना दिसून येतात त्यांना वाहतूक पोलीस व महसूल खात्याचा धाक उरलेला नाही असे दिसून येते. या काळात अवजड वाहनांनी कोणाला चिडले तर याचे जबाबदार कोण असा प्रश्न संतापलेले नागरिक करीत आहे.
पोलीस अधीक्षक साहेब आपण धुळे शहरात भर दिवसा सुसाट फिरणाऱ्या अवजड वाहनांवर कडक कारवाई करून ; धुळे शहरातील विविध भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याचे आदेश द्याल अशी स्थानिक नागरिक अपेक्षा करीत आहे.
तसेच रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्स साठी नदीकिनारी ट्रॅव्हल्स पॉईंट नेमून दिलेला असताना आयकर भवन समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ट्रॅव्हल्स पॉईंट तयार झाला आहे येथे रात्रीच्या वेळी गुजरात जाणारे ट्रॅव्हल्स थांबत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसून येते हा बेकायदेशीर ट्रॅव्हल्स पॉईंट देखील अपघाती क्षेत्र झाला आहे. येथे नेहमी किरकोळ अपघात होत असतात यावरून भांडण देखील होत असतात पोलीस प्रशासन येथे देखील मोठा अपघात होण्याचे वाट बघत आहे का ?

