धुळे शहरातील शिक्षण व्यवस्थेची दुर्दशा : याला जबाबदार कोण ?
महापालिकेच्या एकूण 42 शाळांपैकी फक्त 18 शाळा सुरू
सुरू असलेल्या 18 पैकी फक्त 2 मराठी शाळा उर्वरित 16 उर्दू माध्यमांच्या शाळा
मराठी भाषेसाठी जसे लढत आहोत तसेच मराठी शाळेसाठी लढण्याची गरज
आयुक्त मॅडम पाच कोटी रुपये निधी गेला कुठे :- ललित माळी यांचा सवाल
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- शहरात दिवसेंदिवस शिक्षण व्यवस्थेची अत्यंत दूर्दशा होत असून याला जबाबदार कोण ? असे प्रश्न आता सामान्य जनता करू लागले आहे. धुळे शहर हे एकेकाळी उत्तर महाराष्ट्राची शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं होते. पुण्यानंतर दुसरं नाव धुळ्याचं घेतलं जायचं. पण आज धुळे शहरातील शिक्षण व्यवस्था अक्षरशः रसातळाला गेली आहे.
महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहेत, उरलेल्या शाळांची अवस्था बिकट आहे, अनेक शाळांच्या जागांवर व्यापारी संकुलं उभी राहत आहेत… आणि महानगरपालिका डोळेझाक करत आहे!
धुळे शहरातील धक्कादायक वास्तव…
✔️ महानगरपालिकेच्या एकूण ४२ शाळा, त्यापैकी फक्त १८ शाळा सुरू, बाकी बंद किंवा व्यापारी संकुलात रूपांतर!
✔️ सुरू असलेल्या १८ पैकी फक्त २ मराठी शाळा, तब्बल १६ उर्दू शाळा सुरू!
✔️ महापालिकेच्या मोक्याच्या जागांवर असलेल्या अनेक शाळांच्या जागा व्यापारी हितसंबंधासाठी वापरण्यात आल्या!
✔️ उरलेल्या शाळांमध्ये पाणी नाही, स्वच्छतागृहे नाहीत, योग्य बेंच नाहीत… विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मोठी फरपट!
✔️ खाजगी शाळांमध्ये लाखो रुपयांची फी… सर्वसामान्य पालकांची आर्थिक कोंडी!
निकालाचा धक्का – धुळे महानगरपालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल…
धुळे शहरातील महापालिका शाळांचा दहावीचा निकाल अत्यंत लाजीरवाणा आहे:
▪️ एका शाळेत फक्त २६ विद्यार्थी दहावीसाठी बसले, त्यापैकी:
➡️ १४ विद्यार्थी नापास,
➡️ १२ विद्यार्थी काठावर पास,
▪️ शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, विद्यार्थी संख्या नगण्य…
▪️ वर्गात फक्त २ बेंच… विद्यार्थ्यांना बसायची व्यवस्था नाही…
हे शिक्षणाचा दर्जा आहे की व्यवस्थेचा अपमान?
शाळांमध्ये केवळ खिचडी खायला जाणाऱ्या मुलांना पुढचं भविष्य काय मिळणार? धुळे शहर घडणार कसं?
५ कोटी रुपये मंजूर… पण काम शून्य!
महापालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी चार महिन्यांपूर्वी ५ कोटी रुपयांचा निधी शाळा दुरुस्ती व रंगरंगोटी साठी मंजूर केला होता,
पण आजतागायत त्या पैशाचा उपयोग कुठे झाला, याचा पत्ता नाही!
शाळांची अवस्था पूर्वीपेक्षा वाईट… पालक आणि विद्यार्थ्यांचे हाल मात्र वाढले!
बीओटी तत्त्व लागू करा – शाळा वाचवा, शिक्षण वाचवा!
महापालिकेला शाळा चालवता येत नसतील, तर त्या शाळा बीओटी (Build-Operate-Transfer) तत्त्वावर सामाजिक संस्था किंवा शिक्षण क्षेत्रातील सक्षम व्यक्तींना दिल्या पाहिजेत.
▪️ परंतु त्या शाळांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश आणि शिक्षणावर कमी शुल्काचे बंधन असावे.
▪️ महापालिकेच्या जागांचा वापर केवळ शिक्षणासाठी व्हावा, व्यवसायासाठी नव्हे.
▪️ ज्या शाळांच्या जागा व्यापारी संकुलं झाल्या आहेत, त्यांची चौकशी करून त्या जागा परत मिळवाव्यात.
खाजगी शाळांमधील लुट थांबवा!
खाजगी शाळा म्हणजे आज फक्त पैसा वसुलीचं केंद्र बनल्या आहेत. लाखो रुपयांची फी… सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी!
महापालिका आणि शासनाने या मनमानीवर तातडीने कारवाई करावी, ही आमची ठाम मागणी आहे.
टीकेच्या पलीकडे कृती हवी!
▪️ मुंबईत मराठी शाळा बंद झाल्याच्या नावाने टीका करणारे नेते धुळ्यातल्या शिक्षण व्यवस्थेच्या अधःपतनाकडे कधी पाहणार?
▪️ मराठी अस्मिता, भाषाभिमान या घोषणा निवडणुकीपुरत्याच हवेत का?
▪️ धुळे शहराचा शिक्षणाचा दर्जा आणि मराठी शाळांचा सन्मान वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील का?
▪️ शाळांच्या जागांचा गैरवापर थांबवून त्या जागांवर पुन्हा शिक्षण फुलवणार का?
ललित माळी यांच्या प्रमुख मागण्या –
✅ महापालिका शाळांचे तातडीने डांबरीकरण, रंगरंगोटी, सुविधा सुधारणा
✅ बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस पावलं
✅ व्यापारी संकुल झालेल्या शाळांच्या जागा शिक्षणासाठी परत मिळवणे
✅ शाळा बीओटी तत्त्वावर सामाजिक संस्थांना देऊन शिक्षण सुरू ठेवणे
✅ खाजगी शाळांच्या मनमानीवर लगाम
✅ मराठी शाळांसाठी विशेष योजना
✅ शिक्षणाच्या नावाखाली होणारी लूट थांबवणे
शाळा म्हणजे फक्त इमारती नाहीत त्या शहराच्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवतात!
महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे धुळेकरांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही.
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा… धुळ्याचा भविष्य वाचवा!
धुळेकरांचा आवाज बुलंद करा… शिक्षणासाठी लढा सुरू ठेवा!

