गावठी पिस्तूल तस्करी करणारा धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- 28 जून रोजी मध्यरात्री धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, निळया रंगाचा टी शर्ट व काळया रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेला इसम नामे आतिक रफिक शेख हा बेकायदेशिररित्या विना परवाना देशी बनावटीची एक पिस्तूल बाळगुन आर्वी गावाकडून मालेगांवकडे जाणार असल्याची माहिती मिळाली त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षांत घेवून मा.पोलीस अधीक्षक, धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनपर सुचनेप्रमाणे अधिनस्त असलेले रात्रगस्तीचे पोलीस उप-निरीक्षक, कृष्णा पाटील आणि आर्वी दुरक्षेत्र येथे कर्तव्यार्थ असलेले पोहवा-चेतन कंखरे, पोहवा-सुमित ठाकुर, पोकॉ सुरेन्द्र खांडेकर, पोकॉ-कुणाल शिंगाणे, पोकों-रविंद्र सोनवणे, पोकॉ-महेन्द्रसिंग गिरासे, पोकों-कांतीलाल शिरसाठ, अशांचे स्वतंत्र पथक तयार करुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-03 वर आर्वी गावाचे पुढे मालेगांवकडे जाणा-या रोडवर पुलाचे पुढे भारत पेट्रोलपंप जवळ नाकाबंदी करीत असतांनाच एक अनोळखी इसम रस्त्याच्या कडेकडेने जात असतांना दिसला म्हणून त्यांस पोलीस पथकाने आडवले असता तो पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच पोलीस पथकाने त्यास 23.20 वाजेच्या सुमारास जागीच पकडून त्याला त्याचे नांव गाव विचारता त्याने त्याचे नांव आतिक रफिक शेख वय-27 रा.इंदीरा नगर, नवगजी पार्क, वैजापुर जि.संभाजीनगर असे कळविले त्यावरुन बातमीची खात्री झाल्याने त्याच्या कब्जातील बॅगेची झडती घेतली असता त्यात त्याचे कब्जात 35000/-रुपये किंमतीची एक गावठी बनावटीची पिस्तोल आणि 2000/-रुपये किंमतीचे दोन काडतूस असे एकुण 37000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या प्रकरणी पोकॉ-1754 रविंद्र भिमराव सोनवणे यांच्या तक्रारीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक-405/2025 शस्त्र अधिनियम वर्ष-1959 चे 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उप-निरीक्षक छाया पाटील धुळे तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.

