फागणे बाळापुर गावात दरोडेखोरांचा उच्छाद :- एकाच रात्रीत 8 ते 10 घरे फोडले
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- तालुक्यातील फागणे व बाळापूर उपनगरात चोरांनी तब्बल 8 ते 10 घरे फोडली आहे. चोरांनी पुन्हा बाळापूरकरांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सहा घरांपैकी काही घरात चोरी करून सोने चांदीचे दागिने,रोख रोकड असा ऐवज या चोरट्यांनी पळवला आहे.
काही बाहेर गावी तर काहीजण गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी संधी साधत घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, घरातील साहित्याची नासधूस केली आणि सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. या चोरीमुळे लोकांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला घर फोडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांना पकडावे, चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस वाढवावे अशी मागणी नागरिक करत आहेत..
तालुका पोलिसांनी दाखल होऊन पंचनामे करून घटनेची तात्काळ माहिती घेत अधिक तपास सुरू केला आहे .

