महाराष्ट्रात मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही! शिवसैनिकांविरुद्ध एकतर्फी कारवाई मागे घ्या ! शिवसेना उ.बा.ठा चे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन

0

 


महाराष्ट्रात मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही! शिवसैनिकांविरुद्ध एकतर्फी कारवाई मागे घ्या ! 

शिवसेना उ.बा.ठा चे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन

जनसंघर्ष न्यूज 

  धुळे :-   परप्रांतातून पोट भरण्यासाठी व नोकरीनिमित्त आलेल्या परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सतत मराठी भाषेचा व मराठी लोकांचा अपमान करण्यात येत आहे. व त्याला सत्ताधाऱ्यांकडून खत पाणी घातले जात असल्याचा आरोप करत शिवसेना पक्षातर्फे आज धुळ्यात धुळे जिल्हाधिकारी विसपुते मॅडम व पोलीस अधीक्षक यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. 

      धुळे शहरासह जिल्ह्यात व राज्यात अनेक बँकांमध्ये पर राज्यातून कर्मचारी व अधिकारी नोकरी निमित्त पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेले असतात व या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मराठी भाषेचा व मराठी माणसाचा अपमान करण्यात येतो याचा प्रत्यय अनेक नागरिकांना बँकांमधून येतो. बँकेचा ग्राहकांशी अरेरावीने वागणे, त्यांना धुडकावून लावणे, असले प्रकार नित्यानेच होत आहेत अनेक बँकांमध्ये ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देण्यात येते व त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही अग्रस्थानी असून सदर बँकेकडून ग्राहकांना विनाकारण त्रास देण्यात येतो तासनतास त्यांना उभे करून ठेवण्यात येते त्यातच परप्रांतीय कर्मचाऱ्यांकडून हिंदी भाषेत बोलण्याची सक्ती करण्यात येते व मराठीत बोलल्यास ग्राहकांचा अपमान करण्यात येतो. या संदर्भात शिवसेना पक्षाकडे अनेक तक्रारी वेळोवेळी प्राप्त झाल्या आहेत. अशाच प्रकारे एक तक्रार नुकतीच शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी तसेच शिवसेनेचे धुळे  माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडे प्रा पद्मा किसन शिंदे यांनी दिली होती व यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे महानगर प्रमुख धीरज पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र उर्फ न्हानू भाऊ परदेशी व पदाधिकारी धुळे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रमोद नगर येथे चौकशीसाठी गेल्या असता त्यांना देखील सदर गोष्टीचा प्रत्यय आला या ठिकाणी नोकरी निमित्त आलेले बँकेचे कर्मचारी श्री अतुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांसमक्ष तक्रारदार महिलेचा अपमान केला व मराठी भाषेचा अपमान केला या कारणावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समज दिली असता व त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असता. त्यांच्यावर कार्यवाही होण्याऐवजी त्यांनीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खोटी तक्रार देत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. सदर कारवाईत तक्रारदार महिलेची तक्रारीची कोणतीही दखल न घेता उलट समज देण्यास गेलेल्या शिवसेनेच्या माजी महानगर प्रमुख नरेंद्र  परदेशी,महानगर प्रमुख धीरज पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी खोटा गुन्हा नोंदवत तात्काळ अटक केली व रात्रीपासून त्यांना पोलीस स्टेशनला दाबून ठेवण्यात आले होते. याउलट ग्राहकांशी अरेरावीने वागणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला नाही व त्याला अटक देखील करण्यात आली नाही. यावरून सदरची कारवाई ही राजकीय प्रेरित असल्याचे दिसून येते. 

           यासंदर्भात आज शिवसेनेच्या राज्य उपनेते शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते मॅडम, तसेच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या एकतर्फा कारवाईचा निषेध केला. तसेच महाराष्ट्रात नोकरीनिमित्त पोट भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून मराठी भाषेचा व मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या एकतर्फा कारवाईचा निषेध करत सदरचे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी शुभांगी ताई पाटील यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. 

         निवेदन देते प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी निंबा मराठे, भरत मोरे, प्रशांत भदाणे, महादू गवळी, शिवाजी शिरसाळे, अण्णा फुलपगारे, विष्णू जावडेकर, अजय चौधरी, पिनू सूर्यवंशी निलेश कांजणेकर, योगेश पाटील ज्योती चौधरी आदी शिवसेनेचे बहुसंख्या महिला पदाधिकारी वपदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)