इर्शाद भाईंच्या नेतृत्वात धुळ्यात राष्ट्रवादीला बळ
आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू-कैलास चौधरी
धुळे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांच्या आदेशाने व माजी मंत्री आमदार तथा धुळे जिल्हा प्रभारी अनिलजी पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते इर्शाद भाई जहागिरदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष कैलास भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात दिनांक 10 जून 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यव्यापी मेळावा पार पडणार आहे, त्या अनुषंगाने आज दिनांक 8 जून 2025 रोजी धुळे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते किरण नाना शिंदे हे होते.
धुळे शहरातून जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होण्यासाठीचे नियोजन व मार्गदर्शन करण्यात आले.
पक्षाच्या राज्यव्यापी मेळाव्याला धुळे शहरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते पुणे येथे घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून प्रत्येक पदाधिकारींनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित करावे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे शहरात कमकुवत झाली असा गोड गैरसमज शहरातल्या अनेक लोकांना झालेला होता परंतु तसं तसं काहीच नसून धुळे शहरात इर्शाद भाई जहागिरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष कैलास भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात शहर कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांनी तब्बल 20,009 सभासद नोंदणी पूर्ण केली, तसेच येणाऱ्या काळात पक्ष पूर्ण ताकतीने आणि जोमाने काम करेल व आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू तसेच येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे असे मनोगत शहराध्यक्ष कैलास भाऊ चौधरी यांनी केले
तसेच आगामी काळात महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका पार पडणार असून त्या साठी पक्षबांधणी करून विशेष लक्ष देऊन सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बघण्याचे सर्वच कार्यकर्त्यांचे स्वप्न आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला मेहनत घ्यावी लागेल असेल मनोगत मा. आमदार प्राध्यापक शरद पाटील सरांनी केले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहराच्या वतीने नुकतेच काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले मा. शामकांतजी सनेर यांचा सत्कार करण्यात आला व राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात त्यांचे स्वागत करण्यात आले
यावेळी मा. शामकांत सनेर, मा.आमदार प्रा. शरद पाटील सर, ज्येष्ठ नेते किरण नाना शिंदे, शहराध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, सचिन बापू दहिते, कार्याध्यक्ष रविंद्र आप्पा आघाव, सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस महेंद्र दादा शिरसाठ, महिला शहराध्यक्ष जया ताई साळुंके, कार्याध्यक्ष जावेद बिल्डर, कार्याध्यक्ष कुणाल पवार, सामाजिक न्याय शहराध्यक्ष आनंद सैंदाने, ओबीसी सेल शहराध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, युवक अध्यक्ष तेजस रणसिंग, डॉ. सर्फराज अन्सारी, युवक प्रदेश सचिव निखिल पाटील, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस अभिजीत देवरे, सेवादल शहराध्यक्ष निलेश चौधरी, एजाज खाटिक, रईस काझी, गणेश धुळेकर, उमेश महाले, संतोष केदार, दयाराम लोंढे, ज्ञानेश्वर पाटील, वसीम पिंजारी, संजय अहिरे, प्रकाश चौधरी, राज चौधरी, राहुल पोळ, जयेश पाटील, कुंदन पवार, स्वप्नील पोळ, विशाल वानखेडे, दानिश पिंजारी, दशरथ शिंदे, पीर मो. शाह, मोहम्मद इस्लाम, वकील अन्सारी, संजय सोनवणे.
तसेच महिलांमध्ये रंजना निकुंभे, चंद्रकला शिरसाठ, ज्योती मरसाळे, मेघा वानखेडे, योजना हिरे, वंदना केदार, शगुफ्ता शेख, सरला मोहने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

