क्रांतिवीर तंटया भिल सेवाभावी संस्थे मार्फत बिरसा मुंडा यांना अभिवादन
जनसंघर्ष न्यूज
धुळे :– क्रांतिवीर तंटया भिल आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गरताड येथे महान आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजासाठी लढणाऱ्या आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या या वीरपुरुषाच्या स्मृतीप्रित्यर्थ संस्थेने कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार सरपंच मारुती पाटिल यानी अर्पण करून त्यांचे योगदान गौरविण्यात आले. संस्थेचे अधक्ष दावल भाऊ आहिरे व पदाधिकारी शरद आहिरे शिवाजी बैसाने व,युवा कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांच्या संघर्षाचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार व्यक्त करण्यात आले. सस्थेचे उपाध्यक्ष कॉ सुरेश मोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "बिरसा मुंडा हे केवळ आदिवासींचे नाही, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी आदरांजली आहे." कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव लक्ष्मण पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन केले.

