मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या विशेष पाठपुराव्याने जयहिंद कॉलनी येथील उद्यान सुशोभीकरणाच्या कामाचा आ अनुप भैय्या अग्रवाल व गजेंद्रशेठ अंपळकर भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते शुभारंभ
जन संघर्ष न्यूज
धुळे- आज दिनांक ०४/०६/२०२५ वार बुधवार रोजी प्रभाग क्र ४ जयहिंद कॉलनी व आनंद नगर येथे लागून असलेल्या मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यात येणार आहे.सदर काम हे सर्व्हे नं १४/१ जयहिंद कॉलनी येथे उद्यान विकसित करणे असे आहे.सदर जागेत जॉगिंग ट्रॅक,ग्रिन जिम ,जेष्ठ नागरिकांना बैठक व्यवस्था करावी अशी नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती .यामुळे सदर काम माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी विशेष पाठपुरावा करून मंजूर करून घेतले.सदर कामाचा शुभारंभ धुळे शहराचे दमदार आमदार श्री अनुप भैय्या अग्रवाल आणि गजेंद्रशेठ अंपळकर जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. सदर काम हे सन २०२४-२५ नागरी दलित्तेतर निधीतून मंजूर करण्यात आले होते.
सदर कामात उद्यानात जॉगिंग ट्रॅक,ग्रिन जिम,कुंपण भिंत रंगवणे,एलइडी लाईट बसवणे आदी महत्वपूर्ण कामे केली जाणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थिती श्री गजेंद्रशेठ अंपळकर जिल्हाध्यक्ष भाजपा,डॉ सुशील महाजन प्रदेश चिटणीस भाजपा महाराष्ट्र, मा जिल्हा सरचिटणीस ओमभैय्या खंडेलवाल,माजी संघटन मंत्री यशवंत येवलेकर,देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी यांची होती.
सदर कामाकरिता मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी तत्कालीन पालकमंत्री ना श्री गिरीष महाजन साहेब आणि त्यांचे विशेष कार्य अधिकारी ( OSD) आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री संदीप जाधव यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता.
सदर काम हे नागरी दलित्तेर निधीतून रु २३ लक्षचे मंजूर करण्यात आले होते.सदर कामामुळे परिसराच्या विकासात भर पडणार आहे.
सदर कामासाठी डॉ सुभाष भामरे माजी केंद्रीय राज्य मंत्री भारत सरकार,आ.अनुप भैय्या अग्रवाल,गजेंद्र अंपळकर जिल्हाध्यक्ष भाजपा,मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील,नगरसचिव मनोज वाघ,प्रभाग इंजी.प्रदीप चव्हाण रावसाहेब,कनिष्ठ अभियंता सौ वर्षा पाटील यांचे सहकार्य लाभले होते.
यावेळी राजे शिवाजी हेल्थ नागरिक संघ अध्यक्ष भाऊसाहेब देवरे,एड एम एस पाटील,गुलाबराव पाटील उपाध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ, एस एम पाटील सर,माजी प्राचार्य प्रा मोहन भदाणे सर,सी एन देसले,प्रा शिवाजीराव चौधरी,प्रा बी एन पाटील,यशवंत गोसावी, सौ निशाताई चौबे माजी अध्यक्ष देवपूर पच्छिम महिला आघाडी ,चारुहास मोराणकर,डॉ संजीवन कुलकर्णी,संजय चोरडिया,प्रा हर्षदीप पाटील सर,योगेश मोराणकर,प्रवीण बोरसे,भोजूसिह राजपूत सर,निलेश राजपूत,दादा ठोंबरे,शेखर कुलकर्णी,नीरज अग्रवाल, समीर दादा पाटील,
संजय ठाकूर, अमोल दाऊभाऊ चौधरी,प्रा सागर चौधरी सर,अविनाश पाटील,यतिन पाटील,सौ सीमा वाघ,सौ वासुमती पाटील,प्रभाकर देशमुख,संतोष मांडले,
आदि नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

