डिजिटल मिडियालाही आता सरकारी जाहिराती मिळणार एस.एम.देशमुख यांचेकडून देवेंद्र फडणवीस यांचे आभार

0


 डिजिटल मिडियालाही आता सरकारी जाहिराती मिळणार

एस.एम.देशमुख यांचेकडून देवेंद्र फडणवीस यांचे आभार

 जन संघर्ष न्यूज 

             मुंबई :- डिजिटल मिडियाला सरकारी जाहिराती मिळाव्यात ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेची मागणी होती.. त्यासाठी परिषदेचा गेली पाच वर्षे पाठपुरावा सुरू होता.. अखेर परिषदेच्या पाठपुराव्याला काल यश मिळाले.. सरकारने सर्व सरकारी विभागांना डिजिटल मिडियाला जाहिराती देण्याबाबत परिपत्रक काढले.. त्यामुळे यापुढे प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक माध्यमाप्रमाणेच डिजिटल मिडियाला देखील सरकारी जाहिराती मिळतील.. महाराष्ट्रात 2500 पेक्षा जास्त युट्यूब चँनल्स आणि पोर्टल्स आहेत.. जवळपास 5000 पत्रकार या माध्यमाशी जोडलेले आहेत.. सरकारी निर्णयाचा या सर्वांना लाभ होईल.. तसेच डिजिटल मिडियाचा अधिक प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल..  तसेच या माध्यमातील पत्रकारांसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होणार आहे.. परिषदेची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे मनापासून आभार..  डिजिटल मिडियाने आता गंभीरपणे पत्रकारिता करीत प्रिन्ट प्रमाणे जनतेचा विश्वास  संपादन केला पाहिजे.. अशी सर्वांना एस.एम. देशमुख यांनी विनंती केली आहे.. सोशल मिडियाला सरकारी जाहिराती सुरू होत असल्याने आता या माध्यमातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देखील मिळाल्या पाहिजेत.. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषद त्यासाठी पाठपुरावा करीत राहील असे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सांगितले. मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्यासह विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्याध्यक्ष मिलींद आष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवडे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपुरकर, सरचिटणीस मन्सुरभाई शेख, डिजिटल मिडीयाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

   गो. पि. लांडगे

 जिल्हा प्रसिद्धी प्रमुख

मराठी पत्रकार परिषद- धुळे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)