उघड्या डीपी, तारा,धुळेकरांच्या जीवावर...
जीवघेण्या वायर, उघड्या डीपी, तरी अधिकाऱ्यांचे महावीर कॉलनी कडे दुर्लक्ष....
जनसंघर्ष न्यूज
धुळे:- पावसाळ्याच्या सध्याच्या दिवसांत शहरातील उघड्या डीपींची समस्या अजूनही कायम आहे. पावसाळ्यामध्ये या डीपींतून शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही या महत्त्वाच्या बाबींकडे महावितरणने साफ दुर्लक्ष केलेले दिसते. वास्तविक, डीपींची दुरुस्ती आणि विजेशी संबंधित तत्सम नादुरुस्त उपकरणांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच हाेणे गरजेचे असते जेणेकरून शाॅकसर्किट हाेणार नाही. मात्र, विद्युत विभागाला आपल्या मूळ कर्तव्याचाच विसर पडलेला दिसताे. साक्री रोड विद्यावर्धिनी कॉलेज मागील महावीर कॉलनी परिसरात असलेल्या उघड्या डीपी व उघड्या केबल मुळे एखाद्याचा जीव जाण्याची घटना नाकारता येत नाही. कारण या डीपीवरील केबलचे लॉक तुटलेलल्या अवस्थेत फ्यूज उघडे
उच्च दाबाच्या तारा, केबल वरील कव्हर निघालेल्या अवस्थेत दिसून येत आहे. अशा समस्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही या महत्त्वाच्या बाबींकडे महावितरण विभाग साफ दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या परिसरात एखाद्याचा जीव गेल्यावर महावितरण प्रशासन जागे होईल का? असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होत आहे.
साक्री रोड येथील विद्यावर्धिनी कॉलेज मागील महावीर कॉलनीत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे , या कॉलनीतील महावितरणच्या डीपी अत्यंत दुरावस्था झालेली असेल केबल जुन्या झाल्या असल्या कारणाने त्यांचे कव्हर फाटल्याने उघडे अवस्थेत आहेत व तेथील काही केबलचे लॉक तुटलेले असल्याने कर्मचाऱ्यांची जीवाची पर्वा न करता रात्री बे रात्री त्या डीपी वर चढून वारंवार त्या वायरी तारेने फिट करून जातात यामुळे या भागात नेहमी लाईट ये जा करत असते व लाईटचे होल्टेज कमी जास्त होत असते त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य खराब होत आहे.
यामध्ये काही केबल जुन्या झाल्या असल्यामुळे त्यांचे कव्हर निघालेल्या अवस्थेत असल्याने तेथे मोकाट जनावरे किंवा लहान मुले जवळ गेले तर त्यांना शॉक लागून जीव गमवावा लागू शकतो अशी परिस्थिती असून देखील महावितरण चे अधिकारी यांना स्थानिक नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तक्रार करून देखील अधिकारी लक्ष देत नाहीत.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर फोन उचलत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहे. स्थानिक नागरिकांनी होणारा त्रास अजून किती दिवस सहन करायचा असा सवाल केला जात आहे. रात्री बे रात्री लाईट जात असल्याने नागरिक त्रस्त आणि अधिकारी गाद्या गरम करण्यात व्यस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मुजोरपणा कधी थांबणार :-
धुळे शहरात विविध ठिकाणी महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसून येत आहे दिवसभरात आठ ते दहा वेळेस लाईट जात असते यामुळे नागरिकांचे व व्यावसायिक, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हा लोकांना दिसत आहे तरीही महावितरण चे अधिकारी त्यांचा गलथान कारभार कारभार थांबविण्याचे नाव काय घेताना दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या या मुजोर कधी थांबणार असे प्रतिक्रिया धुळेकर जनता देत आहे.
होणाऱ्या वीज चोरीची वाढीव लाईट बिल लावून जनतेकडून वसुली :-
महावितरण चे अधिकारी अव्वाचे सव्वा लाईट बिल आकारून कोणाचे घर भरत आहेत असा देखील सवाल धुळेकर जनतेकडून केला जात आहे. गेल्या एक वर्ष पासून लाईट बिल मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे .दुसऱ्यांची विजचोरीची वसुली आम जनतेकडून केली जात आहे असे दिसून येते. अधिकाऱ्यांनी महावितरण येथील कर्मचाऱ्यांच्या घराचे लाईट बिल व मीटर कधी तपासून पाहिले आहे का घरची खेती म्हणून 99% कर्मचाऱ्यांनी स्वतःच्याच घरचे मीटरचे बायपास कनेक्शन करून वीज चोरीचा धंदा मांडला आहे व त्यांची विजचोरीची वसुली जनतेच्या लाईट बिल मधून केली जात आहे. असेच चालू राहिले तर एक दिवस जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे.

