दलित वस्त्यांमधील नित्कृष्ट दर्जाच्या कामांची व दलित वस्ती निधीची चौकशी करा
वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांची मागणी
जनसंघर्ष न्यूज
शिंदखेडा :- येथील दलित वस्तीत गेल्या अनेक वर्षापासून बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, कुंभार टेक व इतर ठिकाणी कामे झालीत पण ती कामे निकृष्ट दर्जाची झालीत आत्ताच बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी रस्त्याचे फेवर ब्लॉक लावून कामे केलीत परंतु कामे होताच तिथल्या फेवर ब्लॉक निघण्यास सुरुवात झालेली आहे व झालेल्या कामाच्या ठिकाणी गटारीवर जाळी आत्तापर्यंत बसविण्यात आलेली नाही. ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.
तसेच वारंवार निवेदन देवून सुद्धा अधिकारी लोकं चौकशीला येतात पण त्यावर कामे मात्र करत नाहीत व सांतवन करण्यासाठी येतात आश्वासने लावून जातात दलित वस्तीत अतिशय नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व कंत्राटी यांच्यावर कुठल्याही प्रकारे कार्यवाही होत नसल्याने अधिकारी देखील या नित्कृष्ट कामाच्या भ्रष्टाचारात सामील आहे का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
मागील वर्षी देखील दि.१२/०२/२०२४ रोजी विविध समस्यांसाठी वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी अमरण उपोषण केले असता अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना लेखी स्वरूपात समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यावर आत्तापर्यंत कुठलेही निराकरण झाले नाही व ते कामे केली नाहीत तरी राहुल पाटोळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून जाहीरपणे इशारा दिला आहे कि, जर का आमची कामे लावकर मार्गी काढण्यात आले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धुळे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.
राहुल पाटोळे यांनी तहसीलदार यांना पुढिल समस्यांचा पाढा वाचून दाखवत लवकरात लवकर सोडवण्याची खालील प्रमुख मागण्या केल्या यामध्ये :-
१) २१ कोटी पाणी योजने अंतर्गत शिंदखेडा शहर वासियांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत परंतु त्या योजनेचे उद्घाटन व काम झालेल्याचे उद्घाटन समारोह मोठ्या उत्साहात केला परंतु बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, कुंभार टेक व इतर ठिकाणी अजूनही नळाला पाणी येत नाही व पाण्यापासून घरीब जनता वंचित आहे ,
२) सिद्धार्थ नगर येथील किरण न्हानभाऊ पाटोळे यांच्या घरापासून ते PWD च्या वॉल कंपाऊड पर्यंत रोडावर सांडपाणी दररोज वाहत असते. व जेष्ठ, लहान मुले व महिला वर्ग खूपदा या रोडा वरून पडून गेलेले आहेत व त्यांना मोठा प्रकारे इजा देखील झालेले आहेत हात तुटणे, पाय तुटणे अशा गंभीर स्वरूपाचे इजा झाल्या आहेत यावर लवकर उपाययोजना काढून ते कामे मार्गी लावावे ,
३) सिद्धार्थ नगर ते ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन मंगल कार्यालय या ठिकाणावर हा रस्ता शहरातील दर्शनी रस्ता असून या ठिकाणी गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात घान-कचरा जमा व तुंबला आहे हा कचरा लवकरात लवकर काढण्यात यावा व गटारीची हाईट व ढापे टाकण्यात यावे ,
४) सिद्धार्थ नगर येथील हिम्मत मंगळे यांच्या घराजवळील स्टेट लाईट हा खराब अवस्थेत झालेला आहे व तेथील गटार ही रोडाच्या खाली असल्यामुळे खालून गटारीच्या बाजूने माहिती हि घसरत आहे व मोठे अनर्थ होण्याचे संकट या पावसाळ्यात दिसून येत आहे तरी हे काम लवकर मार्गी लावण्यात यावे ,
५) आंबेडकर नगर येथील रहिवासी रविंद्र रामदास पाटोळे यांच्या घराजवळील निंबाचे मोठे झाड आहे व ते झाड मोठे असल्यामुळे व इलेक्ट्रिक तार त्या झाडापासून खाली घेलेले आहेत व पावसाळा असल्यामुळे अनर्थ होण्याची मोठी दाट शक्यता आहे. ते निंबाचे झाड कापण्यात यावे अश्या मागण्यांचे निवेदन वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष राहुल रविंद्र पाटोळे यांनी दिले आहे.
यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, चंद्रकांत पाटोळे, नानू भाऊ पाटोळे, विनोद पाटोळे, रोहित पाटोळे, मनोहर पाटोळे, रावसाहेब पाटोळे, सतीश पाटोळे, कैलास निकुंबे, रवींद्र ठाकरे, लक्ष्मण पाटोळे, सिद्धार्थ कुवर , अशोक पाटोळे, हिम्मत मंगळे, अजय पानपाटील, अनिल पाटोळे, संजय कुवर, चेतन पाटोळे, लक्ष्मण दादाभाऊ पाटोळे, न्हानू पाटील ,अजय बैसाने, राकेश राजेंद्र पाटोळे, संजय पाटील, लक्ष्मण बोरसे, छगन पाटोळे इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

