जि.प.शाळा देवभाने येथे "शाळा प्रवेशोत्सव सोहळा" संपन्न.

0

 


जि.प.शाळा देवभाने येथे "शाळा प्रवेशोत्सव सोहळा" संपन्न.    

जनसंघर्ष न्यूज 

     धुळे (प्रतिनिधी ) :-  कापडणे केंद्रातील जि.प.शाळा देवभाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळा-२०२५-२६ संपन्न झाला.

         यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री किरण भरत देसले यांच्या हस्ते व शिक्षण विभागाच्या प्रतिनिधी म्हणून शाळेस भेट देण्यासाठी उपस्थित असलेल्या श्रीमती नम्रता सोनवणे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन करून मेळाव्यास सुरुवात झाली. 

         आज पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आणि या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शाळेबद्दल असणारी भीती दूर व्हावी ,दाखल पात्र बालकांचा शारीरिक ,भावनिक, बौद्धिक, भाषिक विकास कितपत झाला आहे हे पडताळणी करुन खेळीमेळीच्या वातावरणात या बालकांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी हा उद्देश हा शाळा शाळा महोत्सव सोहळा आयोजित करुन साध्य करावयाचा आहे या हेतूने राज्य शासनाच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात शाळा महोत्सव सोहळ्याचे आयोजन आज१६ जून २०२५ वार सोमवार रोजी करण्यात आल्याचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री शिवानंद बैसाणे यांनी सांगितले. 

         शाळा प्रवेशोत्सव सोहळा-२०२५-२६ च्या आधी दोन दिवस पहिले गावात दवंडी देऊन शाळा प्रवेशोत्सव सोहळाची जागृती केली. माता व पालकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले.

        इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.त्याचे शालेय आवारात स्वागत करण्यात आले.तसेच या नवगतांचे सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प,फुगे व टोपी देवून स्वागत करण्यात आले.शाळा प्रवेशत्सावा मधे रांगोळी ,विविध पोस्टर, फुगे लावून शाळा परिसर सजविण्यात आला होता.प्रसन्न वातावरणात दाखल विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.त्यानंतर सर्व नवगतांचे औक्षण करून पायांचे ठसे घेण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणवेश,बुट सॉक्स व पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले तसेच "एक पेड मॉ के नाम" या उपक्रमांतर्गत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.आज विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात वरण भात, मठाची उसळ व विशेष मिष्ठान्न जिलेबी देण्यात आली. 

      शाळा प्रवेशोत्सव अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. 

      कार्यक्रमात यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री किरण भरत देसले व श्रीमती नम्रता सोनवणे मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,मुख्याध्यापक श्री शिवानंद दला बैसाणे, सहशिक्षक श्री नारायण नेरकर सहशिक्षिका श्रीमती अर्चना शिंदे मॅडम,श्रीमती अश्विनी पाटील मॅडम,श्रीमती उज्वला नांद्रे मॅडम व श्रीमती रेखा मोहिते मॅडम, युवा प्रशिक्षणार्थी कु.जान्हवी चौधरी अंगणवाडी सेविका,मदतनीस व दाखल पात्र विद्यार्थी यांचे पालक सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)