अट्टल बाईक चोर शिरपूर पोलिसांच्या ताब्यात १३ लाख ९० हजार रुपये किंमतीच्या १२ मोटर सायकल हस्तगत करून‌ १० गुन्हे उघडकीस

0


अट्टल बाईक चोर शिरपूर पोलिसांच्या ताब्यात 

१३ लाख ९० हजार रुपये किंमतीच्या १२ मोटर सायकल हस्तगत करून‌ १० गुन्हे उघडकीस

जनसंघर्ष न्यूज 

शिरपूर :- शहरातील करवंद नाका परिसरातील मन्साराम दलाल नगर प्लॉट ५२ येथून १९ मार्च रोजी यामाहा एम.टी.१५ मॉडेलची एम एच १८ बी.व्ही ८२७९ ही गाडी चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली होती याबाबत गाडी मालक विक्रम सिंग भगवान सिंग राजपुरोहित यांनी शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. 

            त्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी लागलीच तपास चक्र फिरवून गुन्ह्यायातील चोरीस गेलेले मोटरसायकल व अज्ञात चोराच्या शोध घेण्याबाबत पुणे शोध पथकास आदेश दिले.

          शिरपूर जि.धुळे शहरातुन स्पोर्ट्स बाईक चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने मा. पोनि श्री. किशोरकुमार परदेशी यांनी पोलीस पथक तयार करून चोरट्यांना गजाआड करून दाखल गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले असता त्यानुसार दि.११/०६/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांना गुप्तबातमीदार मार्फत बातमी मिळाली की, दोन इसम वाघाडी ते वाडी गावाचे दरम्यान असलेल्या कुवे फाटा येथे यामाहा कंपनीची एम.टी.१५ मो.सा. विक्री करण्यासाठी येत असुन त्यांचेकडील मो.सा.ही चोरीची असण्याची शक्यता असल्याबाबत बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना लागलीच वरनमुद ठिकाणी सापळा लावण्यासाठी रवाना केले सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी सापळा लावुन थांबवले असता दोन इसम त्यांचे ताब्यातील विना क्रमांकाची यामाहा कंपनीचे एम.टी.१५ मो.सा. वर आले त्यावेळी त्यांना जागेवर पकडले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव १) अनिल जोबा पावरा वय २२ रा. शिंगावे ता. शिरपूर जि. धुळे ह.रा. तेलखेडी ता. धडगाव जि. नंदुरबार व २) दिपक हिरालाल ऊर्फ विजय पावरा वय २० रा. मोयदा ता.शिरपुर जि. धुळे ह.मु विखरण ता. शिरपुर जि. धुळे असे सांगितले त्यांना त्यांचे ताव्यातील मो.सा.बाबत विचारपूस करता ते उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने सदर मो.सा. बाबत त्यांचेकडे चौकशी करणेकामी त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले असता त्यांचे ताब्यातील मो.सा.चे चेसेस नंबर व इंजिन नंबरची खात्री केली असता सदरची मो.सा. शिरपूर शहर पो.स्टे.गुरनं. २२०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल असल्याची खात्री झाल्याने त्यांनी सदरची मो.सा. संगणमताने चोरी केल्याची कबुली दिल्याने ते सदर गुन्ह्यात निष्पन्न झाले आहेत.

         त्यानंतर दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक केली असून त्यांना मा. न्यायालयाने दि. १८/०६/२०२५ रोजी पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे.

        आरोपींना विश्वासात घेवून कौशल्यपूर्वक विचारपूस करता त्यांनी शिरपूर जि. धुळे शहरातुन तसेच जळगाव, नंदुरबार व बडवाणी जिल्ह्यांतुन चोरी केलेल्या मो.सा. लपवुन ठेवल्या असल्याचे सांगितल्याने दोन पंचांसमक्ष सदरच्या मो.सा. वाघाडी. कुवे, शिंगावे, अर्थ अश्या वेगवेगळया ठिकाणाहून जप्त केल्या असुन जप्त केल्या आहेत.

        वरील दोन्ही आरोपींकडून एकूण  १३,९०,०००/- रूपये किंमतीच्या विविध कंपनीच्या एकुण १२ मोटर सायकल सदर गुन्ह्यात जप्त करून शिरपुर शहर पो.स्टे.५, शिरपुर तालुका पो.स्टे.१, शहादा पो.स्टे. जि. नंदुरबार २, पानसेमल पो.स्टे.जि.बडवानी १, बाजार पेठ पो.स्टे जि. जळगाव १ असे एकुण १० गुन्हे शिताफीने उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

        तसेच मागील ३ महिण्यांत गुरनं. २९६/२०२५ प्रमाणे गुन्ह्यात एकुण ९ मो.सा., गुरनं. ५३४/२०२४ मध्ये एकुण ४ मो.सा.. गुरनं. १२८/२०२५ मध्ये ३, गुरनं. ३०४/२०२५ मध्ये १. गुरनं. १८४/२०२५ मध्ये १ तसेच गुरनं. ३२०/२०२५ मध्ये १ मो.सा. अशा एकुण ३१ चोरीच्या मो.सा. हस्तगत करण्यात आल्या आहेत.

        सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास मा. पोनि श्री किशोरकुमार परदेशी सो यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका/रविंद्र आखडमल हे करीत आहेत.

       सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी, डी. बी. पथकाचे पोहेका/राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, पोकों/सोमा ठाकरे, आरीफ तडवी, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटु साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, विलास कोळी व जितेंद्र अहिरराव अशांनी मिळून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)