जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा
धुळे:- श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,धुळे येथे दिनांक 21 जून म्हणजेच जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या प्राचार्य सौ.अपर्णा विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या इयत्ता 5 वी ते 12 वी वर्गातील विद्यार्थींनीनी विविध योगासने सादर करून खर्या अर्थाने योग दिन साजरा केला त्यांना त्यासाठी विद्यालयाच्या योग शिक्षिका सौ. मनिषा कमलेश पाटील यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले विविध ययोगासनांनी विद्यार्थींनीनी सर्वांना प्रभावित केले त्यावेळी प्राचार्य सौ.अपर्णा पाटील यांनी योगा ही भारताची जगाला देण असून मानसिक व शारिरीक सुधृडतेसाठी नियमित योगासने केली पाहीजेत विद्यार्थींनीनी अभ्यासात एकाग्रता येण्यासाठी नियमित प्राणायम वा तत्सम योगासने करून आपल्या अध्ययन प्रगतीचा आलेख उंचवावा त्याकरीता योगशिक्षिका सौ.मनिषा पाटील मदतीला आहेतच तसेच आयुष मंत्रालय भारत सरकारने 2025 च्या योग दिनाची एक देश एक आरोग्य ही थीम जाहीर केली आहे योगामूळे आपल्या शरीराला उर्जेचा स्त्रोत उपलब्ध होत असतो मन,तन,प्रसन्न राहते या शब्दात मनोगत व्यक्त केले विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती. एस.व्ही.अडकमोल, पर्यवेक्षक श्री. प्रदीप एन. देवरे तथा सर्व शिक्षक ,शिक्षिका तथा शिक्षकेतर बंधू भगिनींची उपस्थिती व सहकार्य लाभले.

