लाचखोर मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

0


 लाचखोर मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 

२ हजाराची लाच घेऊन लाज विकणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांच्या अवैध संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

     धुळे :- तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन अंतर्गत जामफळ पाया व बुडीत क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या , तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेली मौजे सोंडले ता.जि.धुळे शेत जमीनीच्या मोबदल्यात तक्रारदार यांना नोकरी मिळावी यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्याची आवश्यकता असल्याने त्यांनी उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) , धुळे यांच्याकडे दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशी कामे तहसीलदार , शिंदखेडा त्यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता. त्यांनी सदरचा अर्ज पुढील चौकशी कामे छोटू पाटील, मंडळ अधिकारी , भाग तामथरे यांच्याकडे दिला असता. त्यानंतर तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी छोटू पाटील यांची वेळोवेळी भेट देऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे अर्जाच्या चौकशी कामे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील मंडळ अधिकारी छोटू पाटील यांनी तक्रारदार यांच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविला नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी १८ जून २०२५ रोजी मंडळ अधिकारी छोटू पाटील यांची चिंतामणी येथील मंडळ अधिकारी कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याशी संपर्क करून कार्यालयात तक्रार दिली होती. 

         लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाने सदर तक्रारीची १९ जून २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी छोटू पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळणे बाबतच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठवण्यासाठी तडजोडीअंती २ हजार रुपये लाचेची मागणी करून लाज स्वीकारण्याचे मान्य केले होते. 

          त्यानंतर २० जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचून मंडळ अधिकारी छोटू पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपये लाच घेताना पकडून त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंध धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे यांनी नाशिकला असता प्रतिबंध विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लाज घेणाऱ्या मंडळ अधिकारी छोटू पाटील यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी तक्रारदाराची मागणी 

प्रकल्पग्रस्तांना व पिढी त्यांना दाखले देण्यासाठी वारंवार फेऱ्या मारायला लावून शेवटी पैशांची मागणी करून नेहमी मानसिक त्रास देणाऱ्या मंडळ अधिकारी छोटू पाटील याने अनेकांना मानसिक त्रास देऊन लाचेच्या स्वरूपात पैसे उकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती जमा केलेली असून त्याच्या अवैद्य संपत्तीची कसून चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारदार यांच्याकडून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)