कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे निकाल चुकीचे- अभाविप
फोटोकॉपी व रिचेकिंग चे शुल्क कमी करा.- ABVP चे कुलसचिवांना निवेदन
जळगाव- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षेचे चुकीचे निकाल लागणे व फोटोकॉपी शुल्क कमी करण्या संदर्भात कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना जळगाव महानगर मंत्री यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आपण सुपरिचित आहातच. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे अभाविप गेल्या 76 वर्षांपासून कार्यरत आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील उन्हाळी सत्र परीक्षांचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. या परीक्षांच्या सुरुवातीपासूनच हलगर्जीपणा दिसून आला आहे.
1) प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न येणे.
2) उपस्थित विद्यार्थ्यांना अनुपस्थिती दाखवणे.
3) चुकीचे रिझल्ट लागणे व अनेक विद्यार्थ्यांचा सारखाच रिझल्ट लागणे.
4) विद्यापीठ फोटोकॉपी आणि रिचेकिंग साठी अमाप फी विद्यार्थ्यांकडून आकारत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे.
5) फोटोकॉपी मागविल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने दिलेली मुदत संपल्यानंतर देखील फोटोकॉपी प्राप्त झाली नाही.
6) फोटोकॉपी प्राप्त झाल्यानंतर असे निदर्शनास आले की, उत्तरपत्रिका तपासणी करताना मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केलेला आहे. ज्यात लिखित प्रश्नांना सुद्धा शून्य गुण देण्यात आले.
जळगाव महानगर मंत्री सागर बारी म्हणाले की, कबचौउम विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून विद्यार्थी गोंधळून गेला आहे. विद्यापीठ प्रशासन मूग गिळून गप्प आहे.
विद्यापीठ प्रशासन वरील समस्या लवकरात सोडवाव्यात अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मोठ्या आंदोलन उभे करेल असे निवेदनात म्हटले आहे.

