तहसीलदार कार्यालयातील खासगी पंटर 30 हजाराची लाज घेताना एसीबीच्या जाळ्यात
जन संघर्ष न्यूज
धुळे :- शासकीय कार्यालयात पैसे घेऊन काम करून देण्यासाठी नेहमी खाजगी पंटर हाताशी ठेवून लाच घेण्याचे काम सुरू असतात. त्याचे ज्वलंत उदाहरण आज बघावयास मिळाले आहे. अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागितल्या प्रकरणी तहसीलदार कार्यालय येथील खाजगी पंटर वाल्मीक प्रतापसिंग झाल्टे ( राजपूत ) यास सोमवार दिनांक 2 जून रोजी धुळे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारा समोर सापळा रचून 30 हजार रुपये लाज घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदर प्रकरण असे की तक्रारदार यांच्या नातू व नातीचे भामटा राजपूत या जातीचे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज करून सदर राजपूत पावती देखील घेतलेली होती. सदर प्रकरणात सुमारे सहा महिन्याचा कालावधी होऊन देखील तक्रारदार यांच्या नातू नातीचे जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना शैक्षणिक कामासाठी वेळोवेळी अडचणी येत असल्याने जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता तक्रारदार व त्यांचे भाचे दिनांक 30 मे 2025 रोजी उपविभागीय अधिकारी यांना भेटण्यासाठी गेले असता अधिकारी बाहेर गेलेले असल्यामुळे त्याच्याशी भेट होऊ शकली नाही त्यावेळी त्यांना कार्यालयात खाजगी पंटर वाल्मीक झाल्टे (राजपूत) हे भेटले व त्यांनी तक्रारदारांना कृपा विभागीय कार्यालयात त्यांचे सर्वांशी चांगले संबंध असून ते अधिकारी माझ्या मार्फत पैसे घेऊन लोकांची कामे करून देतात असे सांगून वाल्मीक झाल्टे यांनी तक्रारदार यांच्या नातूची व नातीचे जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी प्रत्येकी 15000 रुपये याप्रमाणे एकूण 30000 रुपये द्यावे लागतील. त्यातून प्रांत साहेब आयुक्तासीनदार संजय शिंदे व कार्यालयातील कर्मचारी यांना पैसे दिल्याशिवाय हे कामे करणार नाही आणि ते प्रत्यक्षात तुम्हाला भेटणार नाही, काम करायचे असेल तर तीस हजार रुपये माझ्याकडे द्यावे लागतील असे पंटर वाल्मीक प्रतापसिंग झाल्टे याने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून सदर घटनेची संपूर्ण माहिती देऊन तक्रार केली असता सदर तक्रारीची दि.2 जून रोजी तुमचा पंचासमक्ष पडताळणी करून पंटर वाल्मीक प्रतापसिंग झाल्टे (राजपूत) यास धुळे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारा जवळ सापळा रचून 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

