स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई ; दोंडाईचा येथून सराईत मोटर सायकल चोराच्या मुसक्या आवळल्या
3 लाख 45 हजारच्या 7 मोटरसायकल हस्तगत
धुळे :- जिल्ह्यातून मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते की जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असून गुन्ह्यांना आळा घालणे गरजेचे झाले आहे.
या अनुषंगाने दोंडाईचा पोलीस ठाण्यातील भाग -५ गु.र.नं.९०/२०२४ भादवि क.३७९ या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दि.१४ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की, दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुली येथे एक युवक संशयितरित्या उभा आहे . त्या ठिकाणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संकेत युवकास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव कुशल उर्फ दादू परमेश्वर गोसावी, वय-१९ वर्ष ,रा. मालपुर ता. शिंदखेडा सांगत, त्याने त्याचे तर दोन फरार साथीदारांसोबत दोंडाईचा शहरातुन मोटर सायकल चोरी केल्याची कबुली देत लपवून ठेवलेल्या ७ मोटर सायकल काढून दिल्या आहेत.
वरील कारवाईत उघडकीस आलेले गुन्हे पुढिल प्रमाणे 25,000/- रु.किं.ची काळया रंगाची सुझुकी बर्गमन मोटार सायकल विना नंबरची चेसीस क्रमांक MB8EA112DP8113636, इंजिन क्र. AF217441439 मुळ नंबर:- MH-18 CA-6816. दोंडाईचा पो.स्टे. गु.र.नं. 90/2024 भादंवि क. 379 , 2) 20,000/- रु.किं.ची काळया रंगाची होंडाशाईन 125 डिलक्स विना नंबरची मो.सा. चेसीस क्र.ME4JC85DBND013415 इंजिन क्र.JC85ED2042474. मुळ नंबर:- MH-18/BW-2349. दोंडाईचा पो.स्टे गु.र.नं. 117/2025 BNS क. 303(2) , 3) 40,000/- रु.किं.ची लाल रंगाची होंडा अॅक्टीवा विना नंबरची. चेसीस क्रमांक ME4JK13CLRW233933, इंजिन क्रमांक JK13EW7348363 मुळ नंबर MH-18/CG-1455. दोंडाईचा पो.स्टे. गु.र.नं. 118/2025 BNS क.303 (2) , 4) 70,000/- रु.किं.ची लाल काळया रंगाची बजाज पल्सर मोटार सायकल क्र., एमएच-18 एई-753 (बनावट नंबर). चेसीस क्रमांक MD2B68BX6PWB24164, इंजिन क्रमांक DHXWPB02332. मुळ नंबर MH-18/CB-0267. , दोंडाईचा पो.स्टे. गु.र.नं.119/2025 BNS क.303 (2) , 5) 90,000/- रु.किं.ची लाल-काळया रंगाची रॉयल इनफिल्ड बुलेट क्र.एमएच-18 एई-753 (बनावट नंबर), तिचा चेसीस क्रमांक ME3J3A5FGR2002696, इंजिन क्रमांक J3A5FGR2019921. मुळ नंबर MH-18/CH-1616.
दोंडाईचा पो.स्टे. गु.र.नं. 120/2025 BNS क. 303 (2) ,70,000/- रु.किं.ची बजाज कंपनीची पल्सर निळया-काळया रंगाची मोटार सायकल क्रमांक एमएच-12 एफआर-4664 तिचा चेसीस क्रमांक MD2BHDHZZSCF75960 इंजिन क्रमांक DHGBSF67543 असा असलेली जुवाकिंअं 30,000/- रु.किं.ची हिरो कंपनीची पल्सर निळया-काळया रंगाची मोटार सायकल क्रमांक एमएच-41बीके-1581 (बनावट नंबर प्लेट) तिचा चेसीस क्रमांक MBLHA11ETD9F00060 इंजिन क्रमांक HA11EGD9F02612 असा असलेली जुवाकिंअं सदर वाहनाची खात्री करता तिचा क्रमांक MH-15 DZ-5257 असा असल्याचे समजले दाखल गुन्हयाची माहिती घेत असुन अशाप्रकारे 03 आरोपी निष्पन्न करुन, त्यांचेकडुन एकुण 3,45,000/- रु. किं.च्या 06 मोटर सायकल व 01 बुलेट हस्तगत करण्यात आली असुन धुळे जिल्हयातील खालील 05 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
यामध्ये 1) दोंडाईचा 91/2024 भादंवि क.379 , 2) दोंडाईचा 117/2025 BNS क.303(2) , 3) दोंडाईचा 118/2025 BNS क.303(2) , 4) दोंडाईचा 119/2025 BNS क.303(2) , 5) दोंडाईचा 120/2025 BNS क.303(2) गुन्हे नोंद आहेत.
आरोपी खुशाल ऊर्फ दादु परमेश्वर गोसावी, याचेवर यापुर्वी देखील खालील अ.क्र. पोलीस ठाणे गु.र.नं.कलम , 1 ) दोंडाईचा 94/2022 भादंवि क.379 गुन्हा दाखल आहे.
सदर कामगिरी मा.श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, धुळे श्रीराम पवार, सपोनि दोंडाईचा पो.स्टे. श्रीकृष्ण पारधी, असई. संजय पाटील, पोहेकॉ. सचिन गोमसाळे, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, संतोष हिरे, पोकॉ. विनायक खैरनार व हर्षल चौधरी, तसेच दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रविण निंबाळे, राजेंद्र ऐंडाईत, रमेश वाघ अशांनी केली आहे.

