खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या मागणीला अखेर मोठे यश..!
अक्कलपाडा धरण १००% भरणार..!
अक्कलपाडा भाग - २ साठीची जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांचे विभागाला आदेश
जनसंघर्ष न्यूज
धुळे - दि. १८-०६-२५ :- धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी अर्थातच तापी जलवाहिनी, अक्कलपाडा धरण भाग - २ आणि शिंदखेडा तालुक्यासाठी वरदान असलेली प्रकाशा बुराई योजना यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत धुळे लोकसभा मतदार संघातील प्रश्न मांडले होते. जल संपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी मागणी केली होती की अक्कलपाडा धरण १००% भरण्यासाठी आपल्या दालनात बैठक चा आयोजन करण्यात यावे त्यावर नामदार महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत काल मुंबई येथे मंत्रालयात आढाव बैठकीचे आयोजन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळे पाटबंधारे विभाग, सिंचन भवन, धुळे महानगरपालिका सारख्या सर्वच विभागात नियोजनबद्ध आढावा व नियोजन बैठक घेत धुळे महानगरपालिका अंतर्गत जीर्ण झालेली तापी जलवाहिनी, अक्कलपाडा भाग २ आणि प्रकाशा बुराई योजना या सर्व प्रकल्पांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना धुळे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे आणि धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांना देण्यात आल्या होत्या. हे प्रस्ताव वेळीच प्राप्त झाल्याने तापी जलवाहिनी, अक्कलपाडा भाग २ आणि प्रकाशा बुराई योजना या सर्व प्रकल्पांचे प्रस्ताव घेवून मुंबई येथे रवाना झाले होते. आढावा बैठकीत नामदार गिरीश महाजन यांना प्रस्ताव सादर करत आपल्या मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचे व सिंचनाचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. तसेच बैठकी दरम्यान खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी विनंती केली की अक्कलपाडा धरण १००% भरण्यासाठी जमीन अधिग्रहणला सुरुवात करण्यात यावी तसेच निधी देखील लवकरात उपलब्ध करून देण्यात यावा त्यावर जल संपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद देत संबंधित विभागाला तात्काळ अक्कलपाडा धरण १००% भरण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करा आहे आदेश दिले तसेच यासाठी लागणारा निधी देखील मी लवकरच उपलब्ध करून देईल असे आश्वास्त केले.
धुळे शहराची वाढती लोकसंख्या आणि हद्दवाढ गावांतील समावेश यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तापी पाणीपुरवठा योजना ४० वर्षांपुर्वी कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेची पाईपलाईन जिर्ण झाल्याने तिला गळती लागली आहे. या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो. तापीतून धुळ्याला पाणीपुरवठा करणारी ४० कि.मी. लांबीची जलवाहिनी नव्याने करण्याची गरज आहे. याची देखील प्रशासकीय मान्यता लवकरच प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरे असे कि, अक्कलपाडा धरण पुर्ण झाले असले तरी भुमी अधिग्रहणामुळे केवळ ६५ % धरण भरले जाते. अक्कलपाडा धरण हे १०० % धरण भरण्यासाठी २०० हेक्टर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे. काल झालेल्या मुंबईतील बैठकीत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केलेल्या निधीच्या मागणीवर जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत वरील सर्व योजना पूर्णत्वास येण्यासाठी व भरघोस निधी देण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. लवकरच हे सर्व प्रकल्प पूर्ण होवून १००% कार्यान्वित होणार असल्याची माहिती धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली आहे. या बातमीने धुळे शहरासह, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

