भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मित्र पक्षांचीच एकमेकांवर सडकून टीका

0


भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मित्र पक्षांचीच एकमेकांवर सडकून टीका

भाजपा आमदार अनुप भैय्या अग्रवाल व शिवसेना शिंदे गटाचे मनोज मोरे यांचा ३६ चा आकडा वरिष्ठ मध्यस्थी करणार का ?

जन संघर्ष न्यूज 

धुळे :-  शहरात मित्रपक्षच एकमेकांवर सडकून टीका करत असल्याची घटना घडल्यामुळे धुळ्यात राजकारण चांगलेच तापले आहे. 
         भाजपाचे आमदार यांनी एका सुशोभीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्यावर आंदोलनाच्या मुद्द्यावरून सडकून टीका केल्यानंतर मनोज मोरे यांनी देखील आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्यावर पलटवार केला आहे त्यामुळे धुळ्यात चांगलेच राजकीय वातावरण तापलेले दिसून आले.
            सविस्तर बातमी अशी की देवपुरातील जय हिंद कॉलनीतल्या उद्यान सुशोभीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या आंदोलनाविषयी टीका करत बरसले की रस्त्यावर छोटासा खड्डा पडला तर खड्ड्यात बसून आंदोलन करून त्यातून लोकांना आणि प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकार केले जातात यातून काय सिद्ध करणार, स्वतःहि काही काम करायचे नाही एक रुपया विकासासाठी आणायचा नाही तसेच शहरात भव्य छत्रपती शिवस्मारक बांधले जात असताना त्याच्याविरुद्ध वरून कोर्टात जातात ती काय मानसिकता आहे का असे प्रकार करणाऱ्यांचे योग्य वेळी समाचार घेतला जाईल असा इशारा देत सडकून टीका अनुप भैय्या यांनी केली असता.
             शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्यावर जोरदार टीका करत म्हटले की मृत्यूचा सापळा ठरलेल्या नकाणे रोडवर एका मागून एक असे सलग तीन दिवस माणूस पडला तरी दिसणार नाही असे भ्रष्टाचारातून जन्माला आलेले भले मोठे खड्डे तुम्हाला दिसू नये हे धुळेकर मतदारांचे दुर्दैव,,,,,
तुम्ही केलेल्या शेकडो कोटींच्या मोठमोठ्या घोषणा म्हणजे हवेत केलेला गोळीबार बडी बडी बाता प्रत्यक्ष काही ठिकाणा नाही शिवसेना अगोदर काम करते मग बोलते हे धुळेकर नागरिक अनुभवत आहेत ,,,,,
प्रशासन सहकार्य करतं म्हणजे उपकार करत नाही ती त्यांची जबाबदारी आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामांचे समर्थन करून अधिकाऱ्यांची चाटुगिरी करणे आमचे काम नाही आमची बांधिलकी जनतेशी चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शिवसेना स्टाईलनेच कार्यक्रम करू,,,,,
नकाणे रोडवर पडलेल्या खड्ड्यांची दखल जवळ्पास सर्व न्यूज चॅनेल राज्यस्तरावरील व स्थानिक वर्तमान पेपर ने घेतली देशातील नावाजलेले सकाळ वृत्तपत्र समूह धुळ्यातील खड्ड्यावंर मालिका चालवत आहेत मग ते हि चुकीचं लिहित आहेत का?

इंदिरा गार्डन परिसरात एका विकास कामाच्या भूमिपूजनावेळी शहराचे आमदार मा. अनुप भैय्या अग्रवाल यांनी काही एक कारण नसतांना नकाणे रोडवर पडलेल्या खड्ड्यां विरोधात केलेले आंदोलन भयंकर जिव्हारी लागल्याने शिवसेनेवर अत्यंत जहरी टीका केली पहिल्याच पावसात भ्रष्टाचार खड्ड्यातून बाहेर आला अख्खा माणूस बुडून जाईल एवढे मोठमोठे खड्डे आमदारांना छोटे दिसतात हे धुळेकर मतदारांचे दुर्दैव म्हणावे लागेल तब्बल तीन दिवस दहा दहा मीटरच्या अंतरावर भले मोठे खड्डे नव्हे तर भगदाड पडून जमीनच खचली पाहिल्या दिवशी सूचना देऊन प्रशासनाला निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे काम करून घेतले लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा दहा मीटर वर पुन्हा दुसरा खड्डा पडला तिसऱ्या दिवशी पुन्हा तिसरा खड्डा पडला त्याचवेळी नकाणे रोड परिसरातून अनेक नागरिकांचे अपघाताच्या भीती पोटी फोन आले मनोज भाऊ काहीतरी करा शिवसेना स्टाईलने जाब विचारा अन्यथा या मृत्यूच्या सापळ्यात अपघात झाला तर एखाद्याचा जीव जाईल म्हणून आम्ही तिसऱ्या दिवशी नागरिकांना सोबत घेत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरोधात खड्ड्यात उतरून आंदोलन केले व तात्काळ खड्डे बुजवून घेतले परंतु निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आवाज उठवण्यापेक्षा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चाटूगिरी करण्यात धन्यता मानणाऱ्या आमदारांना जमीन खचून पडलेले भगदाड छोटे दिसतात हे धुळेकर मतदारांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल
मा. अनुप भैय्या आमदार पदी विराजमान झाल्यापासून शेकडो कोटींच्या  मोठमोठ्या घोषणा करत आहेत या घोषणा म्हणजे हवेत केलेला गोळीबार असून प्रत्येक्षात काही ठिकाणा नाही नुसत्या बडी बडी बाता आहेत घोषणा केली म्हणजे काम झाले असे आमदार समजतात परंतु शिवसेना अगोदर काम करते मग बोलते हे धुळेकर नागरिक याचा अनुभव घेत आहेत देवपूरला जेव्हा खड्डेपूर नामकरण करा अशी मागणी झाली तेव्हा शिवसेनेनेच अत्यंत दर्जेदार काँक्रिट रस्त्यांचं जाळ धुळे शहरात निर्माण केलं त्यामुळे दुसऱ्याला शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था झालेले आमदार आम्हाला म्हणतात फद्याचे काम केले नाही
प्रशासनाच्या सहकार्या शिवाय कामे होत नाहीत असा गोड गैरसमज आमदारांना झालेला दिसतो आमदार साहेब प्रशासन सहकार्य करतं म्हणजे उपकार करत नाही शासकिय आदेशा प्रमाणे ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेणे अधिकाऱ्यांचे नैतिक कर्तव्य आहे जबाबदारी आहे परंतु भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत लोळणाऱ्या आणि जनतेला मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या अधिकाऱ्यांची चाटू गिरी आम्ही करत नाहीत आमची बांधिलकी जनतेशी आहे अधिकारी आज आहेत उद्या कुठे बदली करून जातील त्यामुळे भ्रष्टाचार्यांची तमा न बाळगता चुकीचे काम करणारे कितीही सुरमा अधिकारी असोत त्यांचा कार्यक्रम शिवसेना स्टाईलनेच केला जाईल म्हणे विकास करायचा असेल तर आमच्या लोकांना निवडून द्या 2019ते 2024 प्रचंड मरणयातना भोगणाऱ्या धुळेकर नागरिकांना सांगा मनपावर सत्ता कोणाची होती? निवडणुका तोंडावरच आहेत कळेल तुम्हाला तुमचा विकास कुठल्या खड्ड्यात गेला ते तुम्ही ज्या इंदिरा गार्डन भागात आज भूमी पूजन केले त्या इंदिरा गार्डन कडून वर्षा बिल्डिंग कडे जाणाऱ्या रस्त्यावर थोडा जोरात पाऊस पडला तरी लोकांच्या घरात पाणी घुसते आहे हि जबाबदारी कोणाची ज्या काँक्रिट रस्त्यावर महिनाभर झाला नाही त्यावर वरून डांबर टाकायचे पुन्हा त्यावर काँक्रिट चा थर ओतायचा हे काम हि तुमच्या दृष्टीने योग्यच आहे का? आम्ही केलेले आंदोलन जिव्हारी लागते मग तुमचे जिल्हाध्यक्ष मालेगांव रोडवरच्या खड्ड्यांविरोधात रात्री नऊ वाजता अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून जाब विचारतात व तात्काळ काम मार्गी लावतात ते योग्य आहेत की अयोग्य हे देखील आपण जाहीर करा
नकाणे रस्त्यावर खड्ड्यातून बाहेर आलेला भ्रष्टाचाराच्या बातम्यांची दखल स्थानिक ते राज्यस्तरीय वर्तमान पत्र राज्यातील प्रसिद्ध न्यूज चॅनेल घेतात राज्यभर प्रसिद्ध असलेला सकाळ वृत्त समूह नकाणे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची मालिका चालवतो असे असूनही आपण आमदार असताना अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी खचलेल्या रस्त्यांवर पडलेले भगदाड ला एवढेसे खड्डे पडत राहतात असे वक्तव्य करणे हे आमदाराला अशोभनीय आहे .
       अशी टीका करत शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी भाजपाचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांची चांगलीच कान उघडणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)