बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश गुन्ह्यातील 8 आरोपींना 4 दिवसासाठी धुळे शहरातून हद्दपार आझाद नगर पोलीस स्टेशनची कार्यवाही

0

 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश गुन्ह्यातील 8 आरोपींना 4 दिवसासाठी धुळे शहरातून हद्दपार

         आझाद नगर पोलीस स्टेशनची कार्यवाही

जन संघर्ष न्यूज 

            धुळे :-  सन 2019 पासून आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीत विविध प्रसंगी गोवंश बंदी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील एकूण 8 आरोपींना बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चार दिवसासाठी धुळे शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. सदर आरोपींवर या आधी देखील गोवंश, गो तस्करीचे विविध गुन्हे दाखल आहेत. 

            यामध्ये १) मोहम्मद कलीम मुक्तार अहमद कुरेशी वय २६ वर्षे रा. सिराज पहेलवानची गल्ली, मौलवीगंज धुळे २) सलमान अब्दुल मन्नान अन्सारी वय ४० वर्षे रा. तल्हा मशिदीजवळ, फिरदोस नगर, धुळे ३) जाकीर हुसैन महेमुद अन्सारी ऊर्फ जाकीर काल्या वय ३९ वर्षे रा. ग न १४, जाकीर डॉक्टरचे दवाखाना नाल्या किनारी, धुळे ४) शेख जावेद शेख अजीज वय ४४ वर्षे रा. कुबा मशिदीजवळ आशियाना नगर, धुळे ५) मोहम्मद शाबान अब्दुल हक्क अन्सारी वय ४३ वर्ष रा. नंदीरोड, रातराणी हॉटेल जवळ फिरदोस नगर, धुळे ६) नियाज अहमद अब्दुल रशिद अन्सारी वय ५० वर्षे रा. ग न १४, मक्का मशिद जवळ माधवपुरा धुळे ७) मोहम्मद जुनैद मुख्तार अन्सारी वय २८ वर्षे रा. ग न १४ मक्का मशिदीजवळ, माधवपूरा धुळे ८) अबरार अहमद अब्दुल सत्तार वय २७ वर्षे रा.ग न १४ मक्का मशिदजवळ माधवपुरा धुळे यासर्व आरोपींना दिनांक ०६/०६/२०२५ रोजी पासून ते दिनांक ०९/०६/२०२५ रोजी पावेतो ०४ दिवस धुळे शहरातून हद्यपार करण्यात आले आहे.

                   सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, पोलीस उप अधीक्षक राजकूमार उपासे यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे आझाद नगर पोस्टेचे पोनि.निवृत्ती पवार, पोसई/रविंद्र महाले व त्यांचे पथकातील पोहेकॉ/गौतम सपकाळे, पोहेकॉ/योगेश शिरसाठ, पोहेकॉ संदीप कढरे, पोहेकॉ/शांतीलाल सोनवणे, पोहेकॉ रफीक पठाण, पोहेकॉ/विजय शिरसाठ, पोकॉ/अनिल शिंपी, पोकॉ/मक्सुद पठाण, पोकॉ/पंकज जोंधळे यांनी सदरची कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)