हिंदी भाषा सक्ती बाबतचे परिपत्रक जाळून शिवसेना उबाठाच्या वतीने होळी करून निदर्शने

0

 

हिंदी भाषा सक्ती बाबतचे परिपत्रक जाळून शिवसेना उबाठाच्या वतीने होळी करून निदर्शने

संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी शिवशिवसेनेचेदोलन करत हिंदी भाषा सक्तीला विरोध

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढला असून त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमांसोबत हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक राज्य शासनाने काढले असून या परिपत्रकास महाराष्ट्रातील तमाम मराठी पालकांसह विद्यार्थी व राजकीय पक्ष यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विरोध पाहता राज्य शासनाच्या वतीने या परिपत्रकाचे पुनश्च शुद्धिपत्रक शिक्षण विभागा कडून काढण्यात आले, पूर्वीच्या परिपत्रकामधील अनिवार्य हा शब्द काढून सर्व साधारण हा शब्द वापरून शब्दांचा खेळ या ठिकाणी सुरू केला आहे. राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेता अनिवार्य या शब्दाचा वापर केल्यामुळे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार हे आता स्पष्ट आहे. 

भारतीय राज्यघटनेत बहुभाषिकतेला मान्यता असून मातृभाषेत शिक्षण घेण्याचा हक्क सर्व मुलांना आहे ,मात्र केंद्र व भाजपा प्रणीत राज्य सरकारे शैक्षणिक धोरणांच्या नावाखाली हिंदी भाषा सर्वत्र लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारकडून मातृभाषेचा अपमान होत असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना मराठी भाषे बाबत महाराष्ट्रातील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आधीच आडमुठे धोरण आहे या इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी भाषा टाळण्याचा जाणून-बुजून प्रयत्न आधीच करत आलेल्या आहेत. 

हा विषय फक्त मराठी भाषेचा विषय नसून महाराष्ट्राची संस्कृती ओळख आणि राज्य भिमानाचा मुद्दा आहे. शिक्षणाच्या नावाखाली मातृभाषेची गळचेपी, महाराष्ट्रातील जनता कदापीही सहन करणार नाही ,गुजरात मध्ये हिंदी सक्तीची नाही मग तिची सक्ती महाराष्ट्रातच का?

महाराष्ट्र राज्य शासनाने आधी मराठी शाळा वाचवण्याचे धोरण अंमलात आणले पाहिजे. 

मराठी भाषा ही महाराष्ट्रीय प्राकृत भाषेची आधुनिक रूप असून ही भाषा संस्कृत मधून विकसित झालेली आहे ,दहाव्या शतकात श्रावण बेळगोळ येथील शिलालेखांमध्ये मराठी भाषेचा  लिखित पुरावा मिळतो. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा असून या भाषेला पंधराशे ते 2000  वर्ष जुना इतिहास आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजवंशात गाथा सप्तशती हा मराठी ग्रंथ लिहिला गेला.सन 1110 मध्ये कभी मुकुंद राजांनी 

रचलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असून मराठी साहित्याचा आरंभ संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाने सोळाव्या शतकात झाला आहे.

 सन 1965 मध्ये मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळाला व त्याची अंमलबजावणी 1966 पासून महाराष्ट्रात झाली. सन 2024 मध्ये भारतातील इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी ही बोलीभाषा सध्या वीस प्रकारात महाराष्ट्रात बोलली जाते, हे सर्व असताना केंद्र शासनाचे धोरण म्हणून हिंदीला स्वीकारणे हा महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांवर अन्याय असून उलट महाराष्ट्र राज्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीची दुसरी भाषा म्हणून सक्ती करण्याच्या निर्णयाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली, धुळे शहरात जुन्या महानगरपालिका चौकात या परिपत्रकांची होळी करण्यात आली,  यावेळी राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून, महाराष्ट्रात  कुठल्याही भाषेची बळजबरी चालणार नाही असे ठणकावत उबाठा वतीने शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे,  युवा सेनेचे पंकज गोरे , सुनील पाटील संदीप सूर्यवंशी, महिला आघाडीचा संगिता जोशी,  ज्योती चौधरी, राजु ढवळे, शेखर वाघ, शिवाजी शिरसाळे,, अण्णा फुलपगारे , सुभाष मराठे, मुन्ना पठाण, कपील लिंगायत, महादु गवळी, डॉ.अनिल पाटील,  तालुका संघटक भैय्या पाटील सुकवद ,विवेक सूर्यवंशी, विश्वनाथ सोनवणे, डॉ. सोमनाथ चौधरी, गजेंद्र पाटील ,शांताराम माळी विजय चौधरी, ईश्वर मराठे विनोद पाटील, सुभाष मराठे,मुन्ना पठाण, पंकज भारस्कर, दिनेश पाटील, संदीप चौधरी, संजू मामा पाटील, पीनु सुर्यवंशी,   अजय चौधरी, पिंटू ठाकूर, सलीम शेख,  शुभम मतकर , विष्णू जावडेकर,सागर निकम, सुरज भावसार,  सागर साळवे,  बंटी अहिरे, भैय्या बच्छाव,  योगेश पाटील ,अनिल शिरसाट ,अमोल ठाकूर , अनिल चौधरी, इस्तियाक आंसरी, युवराज मराठे, केतन भामरे, वैभव पाटील, गुलाब धोबी, प्रदीप भोला भाऊ पाटील तेजस सपकाळ , प्रवीण राणा आदी उपस्थित होते. 

       

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)