बनावट कागदपत्राचा वापर करून स्वस्तिक चित्रपटाची जागा हडप :- रेखा शाह

0


बनावट कागदपत्राचा वापर करून स्वस्तिक चित्रपटाची जागा हडप :- रेखा शाह 

सिटीसर्वेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :-  शहरातील सिटी सर्व्हे नं. 1466/4 व 1466/5 या जागेतील स्वस्तिक चित्रपट गृहाची जागा बेकायदेशीरपणे हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रांची साखळी उभी करण्यात आली. खरेदीखत दि.31 मार्च रोजी तयार करण्यात आले असून त्यात संलग्न असलेली सर्वच कागदपत्रे ही बनावट आहेत. ही कागदपत्रे खरेदीदारांनी सिटी सर्व्हे कार्यालय व महापालिकेच्या कर्मचार्‍यांशी संगनमत करीत मोठा आर्थिक व्यवहार करून तयार केल्याचा आरोप रेखा योगेश शाह व संजय मुंदडायांनी आज पत्रकार परिषदेत केला. प्रसंगी त्यांनी बनावट असलेली व खरी कागदपत्रे सादर केली. तसेच संबंधीतांची चौकशी करून बनावट कागदपत्रे बनविणार्‍या खरेदीदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

        साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला रेखा शाह व संजय मुंदडा हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, खरेदीखतात सिटी सर्व्हे नं. 1466/1 चे दोन उतारे जोडण्यात आले असून त्यातील पृष्ठ क्र. 47 व 49 वरील संगणकीय नोंदी व स्वाक्षर्‍यांमधील विसंगती स्पष्टपणे बनावटगिरी दर्शवते, असेही शहा त्यांनी आहे. विशेष म्हणजे खरेदीखताच्या 40 दिवसानंतर म्हणजेच दि.8 मे 2025 रोजीच वारसांची नावे अधिकृत उतार्‍यात नोंदवण्यात आली आहेत. शहा यांनी सिटी सर्व्हे कार्यालय व जिल्हा भू अभिलेख कार्यालयाला वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही खरेदीदारांची नावे बेकायदेशीररीत्या लावण्यात आल्याचा आरोप केला आहे. वास्तविक 1466/1 या मिळकत पत्रिकेवर कोणतीच जागा शिल्लक नसतांना दुसर्‍या मिळकतींचे जागेेचे वर्णन लिहुन बेकायदेशीर खरेदीखत तयार करण्यात आले होते. तरी यामध्ये सहकार्य करणार्‍या सीटी सर्व्हेतील अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शाह यांनी केली आहे. प्रदीप शाह हा मुख्य संशयीत आरोपी असून त्याने दोघाकडच्यांना फसवले आहे. याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे यावेळी रेखा शाह व संजय मुंदडा यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)