शिंदखेडा येथील दलित वस्त्यांची दुरावस्था
पालकमंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांचे दलित वस्तीवर दुर्लक्ष
वंचित चे राहुल पाटोळे यांचा आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा
जनसंघर्ष न्यूज
शिंदखेडा :- येथील नगरपंचायत अंतर्गत झालेल्या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून कामांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे पाणी योजना येऊन देखील लोकांना आठ दिवसात पाणी मिळत असल्याने नागरिक संतप्त झालेले आहे, तसेच गटारीचे काम देखील निकृष्ट दर्जाचे केलेले असून गटारींवर जाड्या देखील बसवण्यात आलेल्या नाही दलित वस्त्यांमध्ये गटारींवर जाड्या बसवलेल्या नसल्यामुळे अनेक वेळा वृद्ध नागरिकांचे व लहान मुलांचे पाय अडकून छोटे-मोठे अपघात होत असतात तसेच गटारी व्यवस्थित बनविलेल्या नसल्यामुळे गटारीचे पाणी रोडावर वाहत असते त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे एवढी भीषण परिस्थिती असताना देखील नगरपंचायत चे मुख्याधिकारी प्रशासकीय अधिकारी फक्त भ्रष्टाचार करून खुर्च्या गरम करण्यात व्यस्त आहे.
वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रार करून देखील सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर आणि कुंभार टेक येथे येऊन कामाची पाहणी करण्याची सुद्धा गरज वाटत नाही दलित वस्तीचा निधी मध्ये भ्रष्टाचार करून झोपेचे सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री आमदार जयकुमार रावल यांचा धाक आहे की नाही असा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या मनात येऊ लागला आहे.
वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी आमदार जयकुमार रावल यांनी येत्या आठ दिवसात दलित वस्तीतील समस्या सोडविल्या नाही तर नगरपंचायत विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माध्यमांशी बोलताना दिला आहे. व येत्या निवडणुकीत भ्रष्टाचार करणाऱ्या स्थानिक नगरसेवक व अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही इशारा देखील दिला आहे.

