सत्तार मेंटल गॅंगवर मोक्काअंतर्गत कारवाई
धुळे पोलिसांच्या कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून अभिनंदन
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुरनं. 126/2024 भादवि कलम 397 , 323 , 504 , 506 सह हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 ( 1) ( 3) चे उल्लंघन प्रकरणी टोळी प्रमुख 1) सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल सह टोळीतील संघटित गुन्हेगारी तील सक्रिय सदस्य आरोपी 2) अख्तर भांजा उर्फ अख्तर नईम शेख / कुरेशी , 3) विज्या वड्डर उर्फ विजय रामकृष्ण गायकवाड, 4) फारूक बिल्ला उर्फ फारूक भिकन शेख ,5) वसीम बाटला उर्फ वसीम हुसेन शेख व इतर आणखी दोन इसम त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता.
पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर ,प्रभारी अधिकारी चाळीसगाव रोड पोलीस ठाणे यांनी आरोपी विरुद्ध दाखल गुन्ह्याचा पूर्व अभिलेखाची तपासणी केली असता आरोपी टोळी प्रमुख सत्तर मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल त्याच्याविरुद्ध धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी शरीराविरुद्ध सारखे एकूण 40 गुन्हे दाखल असून त्याचा सहकारी आरोपी विज्या वड्डर उर्फ विजय रामकृष्ण गायकवाड यांच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांचे इतर सहकारी आरोपीं विरुद्ध देखील दोन पेक्षा जास्त गुन्ह्याचे आरोपपत्रे विविध न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेली असल्याने सदर गुन्ह्याचे कागदपत्रे व त्यातील पुरावे अभिलेख तपासणी करून गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 111 प्रमाणे वाढ करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे यांचे समक्ष दि.,12/06/2025 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल व टोळीतील सक्रिय सदस्यांनी एकत्रितपणे येऊन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे टोळीच्या माध्यमातून आर्थिक लाभासह इतर लाभ संपादन करण्याच्या उद्देशाने हिंसाचार करून हिंसाचार करण्याचे भय दाखवून तर बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून दरोडा जबरी चोरी जीवे ठार मारण्याची धमकी व अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आल्याने सदर संघटित गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक झाले होते यामुळे वरील नमूद आरोपी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 111 हे वाढीव कलम लागू करण्यात मान्यता दिली असून त्याचप्रमाणे सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर प्रभारी अधिकारी चाळीसगाव रोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

