मुख्यमंत्री साहेब वयोवृद्ध बहिणीं लाडक्या नाहीत का ?
विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याने वयोवृद्ध महिलांवर उपासमारीची वेळ
जनसंघर्ष न्यूज
राज्य सरकार एकीकडे लाडकी बहिण योजना राबवत असून योजनेचे पैसे वेळोवेळी महिलांच्या बँक खात्यात टाकत असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारकडून यापूर्वीपासूनच सुरू असलेल्या श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना अश्या अनेक योजनांकडे मात्र राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप धुळे तालुक्यातील बाळापुर गावातील वयोवृद्ध महिला पुरुषांनी केला आहे.
धुळे तालुक्यातील बाळापुर उपनगर येथील शेकडो वयोवृध्द महिला व पुरुषांचे संजय निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे पैसे नऊ ते दहा महिन्यापासून मिळत नसल्याने त्यांना उतरत्या वयात तहसील कार्यालय व बँकेत चपला जिजाऊ लागत आहेत. तेथे जाऊन देखील तहसील कार्यालयातील व बँकेतील कर्मचारी त्यांना योग्य मार्गदर्शन न करता हाकलावून लावत असतात.
विविध योजनातील लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथील समस्त लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकार सुरू असलेल्या योजनांपैकी आता सध्या फक्त लाडके बहिण योजनेकडेच लक्ष देत असून आमच्यासारख्या गरजू वयोवृद्ध, विधवा बहिणींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तारीख नागरिकांनी केला आहे. ज्याप्रमाणे लाडके बहिण योजनेचे पैसे वेळेवर मिळतात, त्याचप्रमाणे इतर योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळून गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या इतर योजनांचा मानधन आम्हाला मिळावे अशी मागणी पीडित लाभार्थ्यांनी केली आहे.

