खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या कार्याचे एक साल बेमिसाल..!
Author -
Jan sangharsh News
जून ०४, २०२५
0
खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या कार्याचे एक साल बेमिसाल..!
धुळे लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामे करत धुळेकरांप्रती दाखविले विशेष स्नेह..!
जन संघर्ष न्यूज
धुळे -धुळे लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचा अभेद्य किल्ला राहिला होता. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत धुळे लोकसभा मतदार संघानेही परिवर्तनाला साथ देत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना विजयी करीत भाजपाचा झेंडा धुळे लोकसभा मतदार संघावर रोवला गेला पुन्हा २०१४ पासून पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाची धूळ चारित डॉक्टर सुभाष भामरे यांनी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पार्टीने धुळे लोकसभा मतदारसंघावर आपले घट्ट पाय रोवीत आपले भक्कम स्थान निर्माण केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा विजयी होती असा राजकीय अंदाज राजकीय विश्लेषकांनी प्रारंभीच मांडला होता. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनपेक्षितपणे अचानक माजी आरोग्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री असलेल्या काँग्रेसच्या निष्ठावंत व अभ्यासू शिलेदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांना उमेदवारी देत धुळे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उतरविले. सुरुवातीलाच बाहेरचा, उपरा उमेदवार म्हणून डॉ.शोभा बच्छाव यांना विरोधकांसह स्वकीयांचाही रोष पत्करावा लागला. मात्र त्यामुळे खचून न जाता अगदी संयम व शिस्तबद्धपणाने नियोजन करीत डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करीत मतदारांच्या गाठीभेटी घेत निवडणुकीची प्रचार यंत्रणा यशस्वीपणे हाताळली. त्यांचे राजकीय कसब, यापूर्वीची सामाजिक पुण्याई, काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रामाणिक मेहनत फळाला आली आणि लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री असलेल्या डॉ.सुभाष भामरे यांचा माजी मंत्री काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांनी साधारणपणे ३८३१ मतांनी पराभव करीत डॉक्टर बच्छाव या जायंट किलर ठरल्या आहेत. यातून धुळे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा रोवला गेला असून काँग्रेस कार्यकर्त्यांना यामुळे उर्जितावस्था प्राप्त झाली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार म्हणून विजयी होताच सुरुवातीलाच डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे शहर हक्काचे निवासस्थान व जनसंपर्क कार्यालय उभारीत धुळेकरांप्रती आपली नाळ घट्ट केली आहे. केंद्रात खासदार म्हणून शपथ घेतांना डॉ. शोभा बच्छाव यांनी मराठीतून शपथ घेत महाराष्ट्राची मराठी अस्मिता जपली आहे. त्यानंतर तात्काळ मतदार संघातील धुळे शिंदखेडा मालेगाव सटाणा या भागातील सर्व मुख्य प्रशासकीय कार्यालयात, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, मनपा आयुक्त, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, प्रकल्प संचालक, पोलीस प्रशासन, विविध विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका घेत सुरू असलेली विकास गुणवत्तापूर्ण व्हावीत, नागरिकांचे कार्यालयात कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी प्रशासनात प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यात यावी यासाठी विशेष सूचना व पाठपुरावा कायम ठेवला आहे. नागरिकांच्याही प्रत्यक्ष गाठीभेटी घेत संवाद साधित प्रशासन दरबारी प्रलंबित असलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे. मतदार संघातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये नियमितपणे वेळोवेळी बैठका घेत कामकाजाचा आढावा जाणून घेतांनाच कामकाज गतिमानपणे व्हावे यासाठी विशेष आग्रही भूमिका नेहमीच घेतली आहे.
∆ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका
मतदार संघातील शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी सुलतानी संकटात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. मतदार संघात बेमोसमी पाऊस ,अतिवृष्टी व नैसर्गिक संकटात ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्या त्या वेळी खासदार डॉक्टर बच्छाव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करतांनाच शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनास वेगवानपणे पंचनामे करीत शासकीय मदत मिळवून देण्याची भूमिका वेळोवेळी घेतली आहे. शिंदखेडा परिसर, धुळे ग्रामीण, सटाणा बागलाण परिसरात अतिवृष्टी मुळे व शेतीमालाचे योग्य भाव नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला असतांना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे देखील शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचा आग्रह डॉ.शोभा बच्छाव यांनी निवेदनाद्वारे वेळोवेळी मांडला आहे.
∆ मतदार संघातील पाणी प्रकल्प
पाण्याचेच दुसरे नाव जीवन आहे. पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक असून मतदार संघातील प्रत्येक नागरिकास आवश्यक असलेले पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नियोजनबद्धपणे प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला आहे.धुळेकर नागरिकांना पाणीपुरवठा करणारी तापी पाणी पुरवठा योजना पाईपलाईन जीर्ण व नादुरुस्त असल्याने सतत गळतीमुळे वारंवार पाण्याचा पुरवठा खंडित होत असतो.परिणामी धुळेकरांना नियमित स्वच्छ पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. या प्रश्नाकडे विशेष लक्ष वेधित तापी पाणीपुरवठा योजना नव्याने बदलविण्यात यावी व आवश्यक पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी वेळोवेळी धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या समवेत बैठक घेत आवश्यक प्रस्ताव दिल्ली दरबारी सादर करण्याची व जलशक्ती मंत्रालयाकडून त्यास मंजुरी मिळवून घेण्यासाठी डॉक्टर बच्छाव प्रयत्नशील राहिले आहेत. त्याचप्रमाणे मालेगाव ,सटाणा भागातील नागरिकांना व शिंदखेडा येथील नागरिकांना नियमितपणे स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी देखील प्रशासनाकडे वेळोवेळी आढावा बैठक घेतली आहे. दिल्ली दरबारी जलशक्ती मंत्रालयाकडे पाणीपुरवठ्याचे विविध विषय मांडणी करीत निधी प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत मतदार संघातील विविध पाणीपुरवठा योजना, पाईपलाईन आणि अपूर्ण स्थितीत असलेल्या पायाभूत सुविधा तसेच पाण्याचे उपलब्ध स्त्रोत यांचे सविस्तर ऑडिट करून नव्याने उपाययोजना करीत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी लोकसभेत संसदीय अधिवेश काळात केली. त्यात तापी पाणीपुरवठा योजना, अक्कलपाडा धरण पूर्णत्वास आणण्याची योजना, प्रकाशा बुराई सिंचन योजना, सुलवाडे जामफळ योजना, हरणबारी धरण, केळझर धारण, गिरणा धरण, डाव्या उजव्या कालव्यासाठी निधी, दाभाडी १२ गाव पाणी प्रकल्प, झोडगे येथील कानोली प्रकल्प या सर्व महत्वाच्या पाणी आणि सिंचनाच्या प्रश्नांवर लोकसभेच्या संसदीय अधिवेशनात विविध प्रश्न उपस्थित करून निधीची मागणी केली.
∆ दिशा समिती बैठक
दिशा समितीच्या अंतर्गत मतदार संघातील खास करून धुळे, शिंदखेडा तालुक्यांमधील सुरु असलेली व प्रलंबित आणि सुचवलेल्या विकास कामांची माहिती जाणून घेत पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, पंतप्रधान व शबरी, रमाई आवास योजनेच्या प्रलंबित निधीसाठी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या प्रलंबित निधीसाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे खासदार शोभाताई बच्छाव यांनी सांगितले. कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, सर्व ग्राम पंचायांतीचा देखील कामकाज कसे सुरु आहे याचा धावता आढावा जाणून घेत नागरिकांची कामे करा असे आदेशित केले.
∆ शेतीस पाणी मिळणे, सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी प्रयत्न
मतदार संघातील बहुसंख्य नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून असून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावेत, सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी डॉक्टर शोभा बच्छाव सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. धुळे ग्रामीण मधील अक्कलपाडा धरण 100% पूर्ण क्षमतेने भरले जावे व कार्यान्वित व्हावे यासाठी अक्कलपाडा भाग दोन कामास शासनाने मंजुरी देत निधी उपलब्ध करून द्यावा याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,त्याचप्रमाणे केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री सी आर पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. प्रकाशा बुराई सिंचन योजना त्याचप्रमाणे सटाणा भागातील विविध कालवे धरण तलाव प्रकल्पांसाठी देखील प्रारंभी धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील तसेच सिंचन घेऊन पाटबंधारे विभाग यांच्याकडे बैठका घेत पाणीपुरवठा प्रकल्पाचे प्रस्ताव तात्काळ केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे सादर करून घेत विशेष पाठपुरावा करीत निधी मंजूर करवुन घेतला आहे.
∆ जिल्हा नियोजन बैठक
धुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री महोदयालांकडे सकारात्मक पाठपुरावा करीत हक्काने झगडून घेत धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून घेतला आहे व संबंधित विकास कामे आज प्रगती पथावर आहेत.
∆ NHAI
धुळे लोकसभा मतदारसंघातून जाणारे विविध राष्ट्रीय राज्य मार्ग लागावेत, आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी, विविध रस्ते कामे, उड्डाणपुले, मंजूर करीत कामे वेगवानपणे व्हावीत, अवधान येथे उड्डाणपूल उभारावा धुळे ते सप्तशृंगी गड पदयात्रा मार्ग सुरक्षित करण्यात यावा आणि त्याचप्रमाणे महामार्गावरील अतिक्रमणे निष्कासित केली जावी. जेणेकरून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होईल यासाठी केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मुंगसे टेहरे सौंदाणे या गावांना ओलांडताना वारंवार अपघात होतो या अपघात रोखले जावे यासाठी विशेष उड्डाणपुलाची मागणी केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
∆ रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा
धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी व महत्त्वपूर्ण असलेला मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मात्र निधी व योग्य नियोजनाअभावी रेल्वे मार्गाची विविध टप्प्यातील कामे रखडलेली व दुर्लक्षित स्थितीत होती. या प्रश्नी खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत संबंधित प्रकल्प मार्गी लावुन घेतले आहेत. धुळे रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण अद्ययायवतीकरण करणे डॉ. बच्छाव यांच्या पाठपुरामुळे पूर्णत्वास आले आहे. मोहाडी रेल्वे स्थानकाची दुरुस्ती, अद्ययावतीकरणही करण्यात आले आहे. तसेच धुळे ते पुणे व धुळे ते मुंबई दैनंदिन रेल्वे सेवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी यासाठी देखील वेळोवेळी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असून यासही रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. विविध कामांसाठी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडेही पाठपुरावा करीत निधी मंजूर करून घेत विकास कामे करण्यात आली आहेत. धुळे ते पुणे व धुळे ते मुंबई दैनंदिन वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली असता या कामासाठी रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक भूमिका दाखविली असून आगामी काळात नियमितपणे धुळे - पुणे रेल्वे सेवा चाळीसगाव येथील रेल्वे महामार्गावरील वाहतूक लक्षात घेता नियोजन करून सुरू करण्यात येणार आहे.
मतदार संघातील मालेगाव मध्य भागासाठी कॅन्सर हॉस्पिटल व सटाणा बागलाण परिसरासाठी अदयावत सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल उभारण्याची मागणी खासदार डॉक्टर बच्छाव यांनी थेट संसदीय अधिवेशनात केली असून त्यांच्या मागणीस केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने हिरवा कंदील देत संबंधित हॉस्पिटल मंजूर केले आहेत. आगामी काळात संबंधित कामे वेग घेतील. धुळे शहरासाठी आयुष मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आयुष हॉस्पिटल मंजूर करण्यात आले असून त्यासाठी शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. शहरातील ३२ कॉटर्स येथे आयुष हॉस्पिटलची बांधणी करण्यात येणार आहे.
राज्यातील नागरिक, डॉक्टर, हॉस्पिटलधारक आणि रुग्ण यांच्यावर अन्याय करणाऱ्या विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावर संसदेत थेट आवाज उठवला. आरोग्य सेवेसह अन्य क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या इन्शुरन्स कंपन्यांकडून दरवर्षी अनेक तक्रारी समोर येत होत्या. २०२२-२३ मध्ये हॉस्पिटल आणि डॉक्टरांना मंजूर देयकांची सेटलमेंट टक्केवारी ७६% होती, तीच २०२३-२४ मध्ये केवळ ६२% वर आली आहे. हा घसरणारा आकडा केवळ आकडा नाही तर शेकडो रुग्णालये आणि हजारो डॉक्टरांच्या श्रमाचा अवमान आहे. विमा कंपन्या उपचारांना पूर्वमंजूरी देतात परंतु रुग्ण घरी गेल्यानंतर देयके मंजूर करूनही बॅंकेत न जमा करता अनेक चुकीच्या निमित्तांनी त्यावर अडथळे आणतात ही बाब पूर्णतः अन्यायकारक आहे. या अशा घटनांमुळे हजारो कोटींचे नुकसान डॉक्टर आणि रुग्णालयांना होत आहे. म्हणून संसदेत ठामपणे अशी मागणी केली की, सर्व इन्शुरन्स कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वायत्त आणि पारदर्शक समिती गठित करावी. या समितीत वरिष्ठ अधिकारी, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश असावा, जे कामकाजावर सतत लक्ष ठेवू शकतील. आज या मुद्द्याला मी राष्ट्रीय मंचावर मांडल्यामुळे देशभरातून डॉक्टर, हॉस्पिटल चालक, रुग्ण आणि जनतेकडून आभार मानले जात आहेत. हा लढा रुग्णसेवेच्या न्यायासाठी आहे आणि तो अखेरपर्यंत लढणार आहे.
∆ सामाजिक सलोखा
नुकताच गुढीपाडवा (हिंदू नववर्ष) आणि रमजान ईद या सारखे पवित्र सण एकाच दिवशी उत्साहात संपन्न झाले. धुळे शहरात सर्व धर्मातील सण सर्वांनी एकत्रित येवून गुण्या गोविंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरे करावे आणि राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हर्ष व उत्साहाची पर्वणी ठरेल असे मत व्यक्त करत धुळे लोकसभा मतदार संघात गुढीपाडवा आणि रमजान ईद या सारखे पवित्र सण सर्व धर्मानी एकत्रितपणे साजरे करावेत यासाठी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी गुढीपाडवा आणि रमजान ईद च्या निमित्ताने ईद-ए-मिलन सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित केला होता. यावेळी एकाच व्यासपीठावर सर्व धर्मीय, सर्व पक्षीय मान्यवरांना पाहून सर्व धर्मगुरूंकडून धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे कौतुक झाले.
∆ कर्तुत्ववान महिला सन्मान
धुळे लोकसभा मतदार संघात जागतिक महिला दिनानिमित्त पहिल्यांदाच राजकीय मतभेद बाजूला ठेवत विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा मतदार संघाच्या वतीने सन्मान सत्कार कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
मतदार संघातील विविध रुग्णांसाठी पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी आतापर्यंत ६० लक्ष रुपये निधी डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या पाठपुराव्यातून रुग्णांना मिळवून देण्यात आला आहे. मतदार संघातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी वेळोवेळी हिरे वैद्यकीय महाविद्यालय मालेगाव सामान्य रुग्णालय व विविध शासकीय रुग्णालयांना प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानकपणे भेटी देत अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेत आरोग्याच्या उपायोजना सूचना करण्यात आले आहेत. गरजेनुसार आवश्यक असलेल्या ठिकाणी आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत रुग्णवाहिका ॲम्बुलन्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिला जीबीएस रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळतात प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालयात संबंधित रुग्णाची भेट घेत जीबीएस रुग्णांचे प्रमाण वाढू नये यासाठी आरोग्य विभागात विशेष सूचना करीत प्रयत्न केले आहेत. शहरात कुत्र्यांचा वाढता उपद्रव या जखमी रुग्णांची तात्काळ भेट घेत त्यांना धीर देतानाच धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या समवेत बैठक घेत मोकाट जनावर मोकार कुत्रे यांचा बंदोबस्त करणे कामी विशेष राबविण्याची आग्रही मागणी करीत भूमिका घेतली आहे. धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा मालेगाव शहर मालेगाव मध्ये मालेगाव बाह्य सटाणा बागलान परिसरात खासदार निधी त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत.